
मुंबई : बहुतांश लोकांना दोन किंवा तीन खात्यांची गरज असते. एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) त्यांच्या डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंटसह याचं उत्तम नियोजन करू शकते. हे खाते तुम्ही शून्य किमान शिल्लक (no minimum balance) आणि दरमहा मिळणाऱ्या व्याजासह व्हिडिओ KYC द्वारे ऑनलाइन उघडू शकता. एक खाते पगार आणि खर्चासाठी, दुसरं इमर्जन्सी फंडासाठी आणि तिसरं भविष्यातील उद्दिष्ट्ये किंवा कुटुंबासाठी वापरा. DICGC चं अधिक संरक्षण मिळवण्यासाठी मोठी रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये विभागून ठेवा.
| खात्याचा प्रकार | उद्देश | काय तपासावे |
|---|---|---|
| पगार आणि दैनंदिन खर्च | पगार जमा होणे, बिले भरणे, UPI आणि कार्डचा खर्च | उत्तम ॲप आणि UPI, डेबिट कार्डचे फायदे, मोफत डिजिटल ट्रान्सफर |
| आपत्कालीन निधी | ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाची तरतूद, कधीही काढता येणारी रक्कम | किमान शिल्लक ठेवण्याचं टेन्शन नाही, मासिक व्याज, पैसे काढायला सोपे |
| उद्दिष्ट्ये | ट्रिप, गॅजेट किंवा डाउन पेमेंटसाठी पैसे साठवणे | नियमित व्याज, ॲपवरून FD करण्याची सुविधा |
| कुटुंब किंवा जॉइंट खाते | घरातील सामाईक खर्च, मुलांची बचत, पालकांच्या गरजा | जॉइंट खाते सुविधा, फॅमिली प्रोग्राम, मुलांसाठी खाती |
प्रत्येक खात्याचं काम ठरलेलं असेल, तर आर्थिक गणित सोपं होतं. एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) यात वेगळी ठरते, कारण त्यांचे एकच खाते अनेक गरजा पूर्ण करू शकते. खर्चासाठी किंवा इमर्जन्सी फंडासाठी 'डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंट' (शून्य किमान शिल्लक), साठवलेल्या पैशांवर वाढीसाठी दरमहा व्याज, ४ सदस्यांसाठी 'प्लॅटिनम सेव्हिंग्ज अकाउंट' फॅमिली प्रोग्राम आणि १८ वर्षांखालील मुलांसाठी 'किड्स सेव्हिंग्ज अकाउंट' असे अनेक पर्याय यात आहेत.
बहुतांश लोकांसाठी दोन किंवा तीन खाती असणं फायद्याचं ठरतं. यामुळे खर्चाचे पैसे आणि बचतीचे पैसे वेगळे राहतात. तसेच, एका ॲप किंवा कार्डमध्ये तांत्रिक अडचण आल्यास दुसरा पर्याय उपलब्ध असतो. मात्र, प्रत्येक अतिरिक्त खात्यासोबत बॅलन्सचे नियम, KYC अपडेट्स आणि स्टेटमेंट तपासणीची जबाबदारी वाढते. त्यामुळे प्रत्येक खात्याचा एक निश्चित उद्देश असावा.
नोकरदार व्यक्तींसाठी दोन किंवा तीन बँक खाती असणं उत्तम. पहिल्या खात्यात पगार जमा होतो आणि त्यातून रोजचे खर्च भागतात. दुसऱ्या खात्यात इमर्जन्सी फंड आणि अल्पकालीन उद्दिष्ट्यांसाठी पैसे ठेवता येतात. तिसरं पर्यायी खातं कुटुंबाच्या सामाईक खर्चासाठी किंवा मुलांच्या बचतीसाठी वापरता येतं. याव्यतिरिक्त खातं उघडायचं असल्यास त्यामागे ठोस कारण असावं.
पगाराच्या दिवशीच ऑटोमॅटिक ट्रान्सफर सेट करा, जेणेकरून खर्चाआधी बचत होईल. तुम्ही पार्टनरसोबत खर्च शेअर करत असाल, पालकांना पैसे देत असाल किंवा मुलांसाठी खातं उघडायचं असेल, तरच तिसरं खातं जोडा.
यापैकी कोणत्याही कामासाठी नवं खातं हवं असल्यास, तुम्ही शाखा न गाठता आधार आणि पॅनकार्ड वापरून व्हिडिओ KYC द्वारे एयू स्मॉल फायनान्स बँकेत ऑनलाइन सेव्हिंग्ज अकाऊंट उघडू शकता.
इमर्जन्सी फंडासाठी एयू स्मॉल फायनान्स बँक एक चांगला पर्याय आहे. त्यांच्या डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही. रोजच्या क्लोजिंग बॅलन्सवर दरमहा व्याज मिळतं आणि AU 0101 ॲपवरून पैसे सहज काढता येतात. इमर्जन्सी फंडासाठी सोपी प्रक्रिया, झिरो पेनल्टी आणि नियमित व्याज या तीनही गोष्टींची गरज असते, जे हे खाते पूर्ण करते.
सेव्हिंग्ज अकाऊंट इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेशन वापरून तुम्ही बॅलन्सनुसार वार्षिक व्याजाची तुलना इतर बँकांशी करू शकता. मिळणारे परिणाम अंदाजे असतात, कारण प्रत्यक्ष व्याज दिवसाच्या शेवटी असलेल्या रकमेवर आणि खात्याच्या अटींवर अवलंबून असते.
यासाठी दोन सवयी महत्त्वाच्या आहेत: तुम्ही किती पैसे ठेवू शकता यानुसार खात्याची निवड करा, आणि दर काही महिन्यांनी स्वतःहून किमान एक ट्रान्झॅक्शन करा. एयू स्मॉल फायनान्स बँक डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंटसारख्या झिरो-मिनिमम-बॅलन्स खात्यामुळे पहिलं टेन्शन पूर्णपणे दूर होतं.
RBI च्या नियमांनुसार, सलग दोन वर्षे कोणतेही ट्रान्झॅक्शन न केल्यास खातं निष्क्रिय होतं. यात व्याजाचे जमा झालेले पैसे मोजले जात नाहीत. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी बँकेत जावं लागतं किंवा पुन्हा KYC करावं लागतं. त्यामुळे मधूनमधून एखादं छोटं UPI पेमेंट करून खातं ॲक्टिव्ह ठेवा.
एयू स्मॉल फायनान्स बँक ही RBI द्वारे नियंत्रित शेड्युल्ड बँक आहे. इतर कोणत्याही शेड्युल्ड बँकेप्रमाणेच, यातील ठेवींवर DICGC अंतर्गत प्रति बँक प्रति ठेवीदार ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. यात सेव्हिंग्ज, फिक्स्ड आणि रेकरिंग डिपॉझिट्सचा एकत्रित समावेश होतो. स्मॉल फायनान्स बँक आणि मोठ्या बँकांसाठी हे नियम समान आहेत.
हे संरक्षण प्रति बँक असल्याने, एकाच बँकेत दोन खाती असल्यास त्यांना मिळून ५ लाखांचे कव्हर मिळते. बचत यापेक्षा जास्त वाढल्यास, वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडल्याने विम्याची रक्कम वाढवता येते.
एयू स्मॉल फायनान्स बँकेत दुसरं खातं ऑनलाइन उघडण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत: तुमची माहिती भरा, रजिस्टर मोबाईलवर OTP द्वारे आधार नंबर व्हेरीफाय करा, आणि मूळ पॅनकार्डसोबत व्हिडिओ KYC पूर्ण करा. १८ वर्षे वयोगटावरील कोणताही भारतीय नागरिक हे डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंट उघडू शकतो.
प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी हे तयार ठेवा -
खातं सुरू झाल्यानंतर, AU 0101 ॲपवरून तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, FD बुक करू शकता, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता, UPI वापरू शकता आणि तुमचे रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड (RuPay Platinum Debit Card) मॅनेज करू शकता. नवीन खात्याचा लगेच वापर सुरू करण्यासाठी सॅलरी अकाउंटमधून ऑटो-ट्रान्सफर सेट करा.
होय, एयू स्मॉल फायनान्स बँक कुटुंबासाठी अनेक खाती ऑफर करते: 'प्लॅटिनम सेव्हिंग्ज अकाउंट'मध्ये २५,००० रुपयांच्या एकत्रित ॲव्हरेज मंथली बॅलन्सवर कुटुंबातील अतिरिक्त ३ सदस्यांना फायदे मिळतात. १८ वर्षांखालील मुलांसाठी 'किड्स सेव्हिंग्ज अकाउंट' आहे. तर वृद्ध पालकांसाठी डोअरस्टेप आणि व्हिडिओ बँकिंगची सुविधा असलेले 'सीनिअर सिटिझन सेव्हिंग्ज अकाउंट' उपलब्ध आहे.
कुटुंबासाठी असलेल्या खात्यांबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी -
प्रत्येक खात्याला नॉमिनी नक्की जोडा; बँका जास्तीत जास्त ४ नॉमिनी जोडण्याची परवानगी देतात.
जेव्हा अतिरिक्त बँक खात्यांचा कोणताही स्पष्ट उद्देश नसतो, लो-बॅलन्समुळे दंड लागतो किंवा त्यात फक्त नाममात्र पैसे पडून असतात, तेव्हा ती बंद करणे किंवा मर्ज करणे योग्य ठरते. कमी खाती म्हणजे कमी चार्जेस, कमी KYC अपडेट्स आणि टॅक्स भरणं सोपं. तुमची कामं उर्वरित दोन-तीन खात्यांमधून सहज होऊ शकतात.
खातं बंद करण्यापूर्वी या स्टेप्स फॉलो करा -
प्रत्येक कामासाठी वेगळे उद्देश असलेली दोन किंवा तीन खाती बहुतांश लोकांसाठी पुरेशी असतात. एयू स्मॉल फायनान्स बँकेचे झिरो-बॅलन्स डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंट, दरमहा मिळणारे व्याज आणि फॅमिली-फ्रेंडली खाती या सेटअपला भक्कम आधार देतात. तुमचे पैसे खर्च, इमर्जन्सी आणि उद्दिष्ट्यांमध्ये विभागा आणि ज्या खात्यांचा उपयोग नाही ती बंद करा.
एका व्यक्तीची किती बँक खाती असावीत?
बहुतांश लोकांसाठी दोन किंवा तीन खाती पुरेशी आहेत: एक पगार आणि खर्चासाठी, दुसरं इमर्जन्सी फंडासाठी आणि तिसरं भविष्यातील उद्दिष्ट्ये किंवा कुटुंबासाठी.
एकापेक्षा जास्त बँक खाती असणं चुकीचं आहे का?
जोपर्यंत प्रत्येक खात्याचा एक उद्देश आहे आणि तुम्ही बॅलन्सचे नियम पाळत आहात, तोपर्यंत अनेक खाती असण्यात कोणतीही अडचण नाही. जेव्हा न वापरलेली खाती निष्क्रिय होतात आणि त्यावर दंड लागतो, तेव्हा समस्या सुरू होते.
इमर्जन्सी फंडासाठी कोणती बँक सर्वोत्तम आहे?
एयू स्मॉल फायनान्स बँक इमर्जन्सी फंडासाठी अगदी योग्य आहे, कारण त्यांच्या डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही आणि रोजच्या बॅलन्सवर दरमहा व्याज मिळतं.
बचतीसाठी एयू स्मॉल फायनान्स बँक सुरक्षित आहे का?
एयू स्मॉल फायनान्स बँक ही RBI द्वारे नियंत्रित शेड्युल्ड बँक आहे आणि DICGC अंतर्गत प्रति ठेवीदार ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण मिळते.
एयू स्मॉल फायनान्स बँकेत ऑनलाइन दुसरं खातं उघडू शकतो का?
होय, तुम्ही आधार आणि पॅन वापरून व्हिडिओ KYC द्वारे एयू स्मॉल फायनान्स बँकेचे डिजिटल सेव्हिंग्ज अकाउंट ऑनलाइन उघडू शकता.
दोन वर्षे बँक खातं न वापरल्यास काय होतं?
RBI च्या नियमांनुसार हे खातं निष्क्रिय (inoperative) होतं. ते पुन्हा ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल किंवा नव्याने KYC पूर्ण करावं लागेल.
एयू स्मॉल फायनान्स बँकेकडे फॅमिली सेव्हिंग्ज अकाउंट आहे का?
एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या प्लॅटिनम सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये एकत्रित ॲव्हरेज मंथली बॅलन्सवर ४ सदस्यांसाठी फॅमिली प्रोग्रामची सुविधा दिली जाते.
टीप - नमूद केलेल्या सर्व बँकांचे व्याजदर, शुल्क आणि प्रॉडक्ट अटी संबंधित बँकांनी प्रकाशित केल्यानुसार आहेत आणि ते बँकांच्या निर्णयानुसार बदलू शकतात; नियम आणि अटी लागू. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित बँकेच्या वेबसाइटवर सध्याचे दर तपासावेत. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे आणि कोणताही आर्थिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.