
दिल्ली: आईसीएसई, आयएससी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आयसीएसई दहावीची परीक्षा २०२५ १८ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान होणार आहे. आयएससी बारावीची परीक्षा २०२५ १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल दरम्यान होईल.
आईसीएसई दहावीच्या परीक्षेचा कालावधी दोन ते तीन तासांचा असणार आहे. काही परीक्षा सकाळी नऊ वाजता तर काही दुपारी दोन वाजता सुरू होतील. १८ फेब्रुवारी रोजी (सकाळी ११) इंग्रजी भाषा पेपर एक पासून दहावीची परीक्षा सुरू होईल. २७ मार्च रोजी पर्यावरण विज्ञान (गट-२ निवडक) परीक्षेने परीक्षा संपेल.
परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी परीक्षा हॉलमध्ये पोहोचावे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कॅल्क्युलेटर हॉलमध्ये आणू नयेत.
आयएससी बारावीची परीक्षा तीन तासांची असेल. सकाळी आणि दुपारी परीक्षा होतील. १३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण विज्ञान परीक्षेपासून सुरू होणारी परीक्षा ५ एप्रिल रोजी कला पेपर -५ ने संपेल. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी १.४५ पासून १५ मिनिटे प्रश्नपत्र वाचण्यासाठी वेळ असेल. तसेच सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी ८.४५ पासून प्रश्नपत्र वाचण्यासाठी वेळ असेल. २०२५ मे मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होईल.