IBPS Mega Bharti 2025: तब्बल 13,217 पदांसाठी सुवर्णसंधी, पदवीधर आजच करा अर्ज

Published : Sep 24, 2025, 09:14 PM IST

IBPS Mega Bharti 2025: बँकिंग कार्मिक निवड संस्थेने (IBPS) 2025 साठी ग्रामीण बँकांमध्ये 13,217 पदांची मेगाभरती जाहीर केली. यामध्ये कार्यालय सहाय्यक आणि अधिकारी स्केल-I, II, III या पदांचा समावेश असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे. 

PREV
17
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी

IBPS Mega Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) ने सप्टेंबर 2025 मध्ये ग्रामीण बँकांमधील विविध पदांसाठी तब्बल 13,217 जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असली तरी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. 28 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

27
कोणत्या पदांसाठी भरती?

IBPS RRB Recruitment 2025 अंतर्गत खालील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.

कार्यालय सहाय्यक (Multipurpose) – 7,972 जागा

अधिकारी स्केल-I (Assistant Manager) – 3,907 जागा

अधिकारी स्केल-II (Agriculture, IT, Law, CA, Marketing, Treasury, General Banking Officer) विविध शाखांमधील मिळून 1,139 जागा

अधिकारी स्केल-III (Senior Manager) – 199 जागा

एकूण रिक्त जागा: 13,217 

37
अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.

अर्ज प्रक्रिया सुरू: 1 सप्टेंबर 2025 पासून

अंतिम तारीख: 28 सप्टेंबर 2025

अर्ज शुल्क: सामान्य प्रवर्गासाठी रु. 850/-, राखीव प्रवर्गासाठी रु. 175/- 

47
शैक्षणिक पात्रता

कार्यालय सहाय्यक आणि अधिकारी स्केल-I साठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिकारी स्केल-II आणि III साठी संबंधित क्षेत्रातील विशेष पदवी आणि किमान 50% गुण आवश्यक.

कृषी, पशुसंवर्धन, IT, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र, लेखाशास्त्र अशा शाखांच्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. 

57
वयोमर्यादा

कार्यालय सहाय्यक (Multipurpose): 18 ते 28 वर्षे

अधिकारी स्केल-I (Assistant Manager): 18 ते 30 वर्षे

अधिकारी स्केल-II (Manager): 21 ते 32 वर्षे

अधिकारी स्केल-III (Senior Manager): 21 ते 40 वर्षे 

67
का आहे ही संधी खास?

ग्रामीण बँकांमध्ये नोकरीसाठी थेट मार्ग

पदवीधरांसाठी करिअरची उत्तम सुरुवात

वित्त, कृषी, IT सारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी

सुरक्षित बँकिंग नोकरीसह आकर्षक वेतनमान 

77
आजच अर्ज करा

IBPS RRB 2025 ची ही मेगाभरती बँकिंग सेक्टरमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी सुवर्णसंधी आहे. काहीच दिवसांत अंतिम तारीख संपणार असल्याने पात्र उमेदवारांनी विलंब न करता आजच अर्ज करावा. 

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories