Onion Juice On Hair : केस दाट आणि लांब होण्यासाठी अनेकजण कांद्याचा रस वापरतात. कांद्यामधील सल्फर केसांच्या वाढीसाठी मदत करते. पण, शॅम्पूने केस धुतल्यानंतरही कांद्याचा वास जात नाही, त्यामुळे अनेकजण तो वापरणं टाळतात.
केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस टाळूवर लावा. यामुळे केसगळती थांबते आणि केसांची वाढ होण्यास मदत होते.
28
कांद्याचा वास
शॅम्पूने धुतल्यानंतरही केसांमधून कांद्याचा वास जात नाही, त्यामुळे अनेकजण तो वापरणं टाळतात. पण कांद्याच्या रसात काही गोष्टी मिसळल्यास हा वास येणार नाही.
38
केसांना कांद्याचा रस लावताना येणारा वास घालवण्याचे उपाय
केसांना कांद्याचा रस लावल्यावर येणारा वास घालवण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेऊया.
केसांच्या टोकांपर्यंत रस लावणे टाळा. यामुळे वास बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. फक्त 20 मिनिटे डोक्यावर ठेवा. जास्त वेळ ठेवल्यास वास वाढेल. 20 मिनिटांनंतर, सौम्य शॅम्पूने केस धुवा.
58
गुलाब जल
कांद्याच्या रसात थोडे गुलाब जल मिसळल्यास केसांमधील दुर्गंध कमी होतो. उलट, केसांना चांगला सुगंध येतो.
68
कोरफड जेल
कोरफड जेल कांद्याच्या रसाचा वास कमी करू शकते. हे टाळूची खाज आणि इतर समस्या दूर करून केसांच्या वाढीस मदत करते. केसांना चांगली चमकही देते. त्यामुळे कांद्याच्या रसात हे नक्की वापरू शकता.
78
नारळाचे तेल
कांद्याच्या रसात थोडे नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल मिसळून वापरू शकता. यामुळे पोषक तत्वे टिकून राहतात आणि कांद्याचा तीव्र वास कमी होण्यास मदत होते.
88
लॅव्हेंडर किंवा रोझमेरी ऑइल
कांद्याच्या रसात लॅव्हेंडर ऑइल किंवा रोझमेरी ऑइल मिसळू शकता. यामुळे कांद्याचा वास कमी होतोच, शिवाय केसांच्या वाढीसाठीही हे खूप चांगले आहे.