शरीरात हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यावर त्वचा फिकट दिसू लागते. यामुळे त्वचेची नैसर्गिक चमकही कमी होऊ शकते.
शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवतो. या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.
मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजन न पोहोचल्यास रक्तवाहिन्यांवर दाब येतो आणि त्यामुळे डोकेदुखी सुरू होते.
शरीरात पुरेसे लोह नसल्यास, ऊतींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक हिमोग्लोबिन तयार होत नाही. यामुळे उर्जेची कमतरता जाणवते.
लोहाच्या कमतरतेमुळे हात आणि पाय नेहमी थंड पडल्यासारखे वाटतात.
गुडघे आणि तळपायांमध्ये सतत वेदना होत असल्यास लक्ष द्या. हे लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
Marathi Desk 3