
हॉटेल, रेस्टॉरंटमधलं भेसळयुक्त किंवा खराब जेवण खाऊन तुम्ही हैराण झाला आहात का? आता याची तक्रार करणं खूप सोपं झालंय. तुमच्या एका क्लिकवर थेट कारवाई होऊ शकते. FSSAI ने असुरक्षित अन्नाबद्दल तक्रार करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' (Food Safety Connect) नावाचं एक नवीन ॲप आणलं आहे. त्यामुळे आता कोणत्याही खाद्यपदार्थांच्या दुकानात अस्वच्छता दिसली किंवा जेवणात भेसळ आढळली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या ॲपवर तक्रार कशी करायची ते सविस्तर जाणून घेऊया.
स्टेप 1: तुमच्या मोबाईलमध्ये 'फूड सेफ्टी कनेक्ट' (Food Safety Connect) ॲप डाउनलोड करा. हे एक तक्रार निवारण ॲप आहे.
स्टेप 2: ॲपवर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून लॉग इन/रजिस्टर करा.
स्टेप 3: 'Lodge Complaint' किंवा 'Register Complaint' या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4: ज्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा किंवा दुकानाची तक्रार करायची आहे, त्याचं नाव आणि पत्ता टाका.
स्टेप 5: खराब जेवण, अस्वच्छ किचन किंवा अन्नपदार्थांशी संबंधित समस्येचा फोटो किंवा व्हिडिओ काढून अपलोड करा.
स्टेप 6: जेवणातील समस्या किंवा अस्वच्छतेबद्दल थोडक्यात माहिती लिहा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
स्टेप 7: तक्रार नोंदवताच तुम्हाला एक 'कम्प्लेंट रेफरन्स नंबर' (Complaint Reference Number) मिळेल. या नंबरवरून तुम्ही तुमच्या तक्रारीचं स्टेटस तपासू शकता.