Hepatitis B : वेळीच ओळखा ही लक्षणं, नाहीतर यकृताला होईल गंभीर धोका!

Published : Apr 05, 2026, 04:22 PM IST
Hepatitis B Symptoms and Prevention

सार

Hepatitis B Symptoms and Prevention : हेपेटायटीस बी हा एक व्हायरस आहे जो संक्रमित रक्त किंवा शरीरातील द्रवांच्या संपर्कातून पसरतो. असुरक्षित लैंगिक संबंध, सुया शेअर करणे किंवा प्रसूतीदरम्यान आईकडून बाळाला याचा संसर्ग होऊ शकतो.

Hepatitis B Symptoms and Prevention : हेपेटायटीस बी हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ज्यामुळे थेट आपल्या यकृतावर (liver) परिणाम होतो. यावर वेळीच उपचार केले नाहीत, तर पुढे जाऊन यकृत खराब होणे, सिरोसिस आणि यकृताचा कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अनेकदा प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला हा संसर्ग होतो. हेपेटायटीस बी फाऊंडेशनच्या मते, जन्मावेळी संसर्ग झालेल्या बाळांना HBV (हेपेटायटीस बी व्हायरस) होण्याची शक्यता तब्बल ९० टक्के असते.

त्यामुळे गर्भवती महिलांनी वेळीच तपासणी करून उपचार घेणं गरजेचं आहे, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा व्हायरस संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या किंवा शरीरातील इतर द्रवांच्या संपर्कात आल्याने पसरतो.

असुरक्षित लैंगिक संबंध, एकमेकांच्या सुया वापरणे किंवा प्रसूतीदरम्यान आईकडून बाळाला संसर्ग होणे, या मार्गांनी तो पसरू शकतो. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नमिता कपूर सांगतात की, अनेक लोकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये आणि बाळांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

हेपेटायटीस बीची मुख्य लक्षणं

  • थकवा
  • त्वचा आणि डोळे पिवळे पडणे (कावीळ)
  • लघवीचा रंग गडद होणे
  • पोटदुखी
  • भूक न लागणे
  • मळमळ आणि उलट्या

बाळ जन्माला येत असताना, आईच्या रक्तामधून आणि शारीरिक द्रवांमधून त्याला व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. ज्या भागांमध्ये या व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे अशा प्रकारे बाळांना दीर्घकाळ टिकणारा संसर्ग होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर आईला संसर्ग असेल आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत, तर बाळाला व्हायरस होण्याची शक्यता खूप जास्त असते.

गर्भवती महिलांनी लवकरात लवकर हेपेटायटीस बीची तपासणी करून घेतली पाहिजे. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर बाळाला वाचवण्यासाठी योग्य ती पावलं उचलता येतात. हेपेटायटीस बीचा प्रसार रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाळाला जन्मानंतर २४ तासांच्या आत लस देणे. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत त्याला आणखी दोन डोस देण्याची गरज असते. जर हेपेटायटीस बी असलेल्या आईने बाळाला जन्म दिला, तर १२ तासांच्या आत HBIG (Hepatitis B Immune Globulin) दिल्यास बाळाला तात्पुरतं संरक्षण मिळतं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gold Locket: वाढदिवसाला द्या असं गिफ्ट, जे आठवणही राहील आणि गुंतवणूकही होईल; पाहा 1gm गोल्ड लॉकेटच्या खास डिझाइन्स
Silver Kada: 1 वर्षाच्या बाळासाठी चांदीचे कडे, वाढदिवसाच्या गिफ्टसाठी 8 सुंदर डिझाइन्स