Health Tips : '8' आकारात चालण्याचे फायदे; वजन कमी करण्यासह अनेक लाभ, जाणून घ्या

Published : Jan 03, 2026, 05:54 PM IST
Health Tips

सार

Health Tips : शारीरिक स्वास्थ्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम समजला जातो. त्यातही चालताना आठ (8) आकारात चालण्याचा व्यायाम केल्यास वजन कमी करण्यासह इतर अनेक आरोग्याचे लाभ मिळतात. याविषयी येथे जाणून घेऊया.

Health Tips : आपल्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात खाण्यापिण्याची आबाळ होत असते. मग अशावेळी नियमितपणे व्यायाम, योगासने करणे तर शक्य होणार नाही. त्यातच कामाचा ताण आणि इतर ताणतणाव असतातच. मग कालांतराने तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. काहींचे एकाच ठिकाणी बसून खूपवेळ काम चालते. त्यामुळे वजन वाढणे, पोट सुटणे अशा समस्या भेडसावू लागतात. डॉक्टरकडे वारंवार जाणे योग्य ठरत नाही आणि ते खर्चिकही असते.

अशा परिस्थितीत चालणे हा व्यायामातील सर्वात सोपा आणि उत्तम प्रकार आहे. वजन कमी करण्यापासून ते संपूर्ण आरोग्यासाठी चालणे खूप फायदेशीर आहे. त्यातही '8' आकारात चालण्याने शारीरिक आरोग्याला अनेक फायदे मिळतात. बाग, घराची गच्ची अशा ठिकाणी तुम्ही आठचा आकार काढून चालू शकता. हा व्यायाम करण्यासाठी वेगाने चालण्याची गरज नाही. मध्यम वेगाने चालता येते. आता '8' आकाराच्या चालण्याने मिळणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांविषयी या लेखात पाहूया.

'8' आकारात चालण्याचे फायदे:

  • कंबरदुखी, टाचदुखी आणि गुडघेदुखीसाठी '8' आकारातील चालणे खूप फायदेशीर आहे.
  • वजन, उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी '8' आकारातील चालणे खूप उपयुक्त आहे.
  • शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करून उत्साह वाढवते. संधिवात (वात) विकारांसाठी हे '8' आकारातील चालणे फायदेशीर आहे.
  • '8' आकारात चालण्यामुळे स्नायू मजबूत होतात.
  • स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी '8' आकारातील चालणे मदत करते.
  • हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.
  • सरळ चालण्याच्या तुलनेत '8' आकारात चालण्याने जास्त कॅलरीज बर्न होतात.

हे कसे करावे?

  • जमिनीवर आठ (8) चा आकार काढा आणि त्यावर मध्यम गतीने चालायला सुरुवात करा. हे 10 ते 15 मिनिटे करता येते. तसेच, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही चालण्याचा वेळ वाढवू शकता.
  • '8' आकारातील चालण्याचा व्यायाम सकाळी रिकाम्या पोटी केल्यास अधिक फायदे मिळतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gut Health : आतड्यांचे आरोग्य बिघडल्याची 'ही' आहेत पाच लक्षणे, आताच ओळखा अन्यथा...
Pomegranate Health Benefits : रोज डाळिंब खाण्याचे आहेत 'हे' जबरदस्त फायदे