Health Risks: उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी अनेकजण घरात आणि ऑफिसमध्ये एसी लावतात. बाहेरून उन्हातून आल्यावर लगेच एसी रूममध्ये थंड हवेत बसायला खूप बरं वाटतं. पण या गारव्यामागे एक मोठा धोका लपलेला आहे. तो कोणता तुम्हाला माहिती आहे का?
उन्हाळ्यात पारा 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातो. अशावेळी उन्हाच्या झळा आणि घामामुळे जीव नकोसा होतो. त्यामुळे अनेकजण बाहेरून आल्याआल्या थेट एसीच्या खोलीत घुसतात. या थंड हवेमुळे मिळणारा आराम शब्दांत सांगता येत नाही. पण या सुखामागे काही आरोग्य समस्या लपल्या आहेत. उन्हातून थेट थंड एसी रूममध्ये जाण्याचे काय तोटे आहेत आणि कोणती काळजी घ्यायला हवी, हे पुढे पाहूया.
25
उन्हातून थेट एसीच्या थंड हवेत बसू नका.
उन्हाळा आला की लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी एसीचा आधार घेतात. बाहेरून आल्यावर लगेच एसी सुरू करून त्याच्यासमोर बसल्यावर खूप आराम मिळतो. पण तज्ज्ञ सांगतात की, हीच छोटी सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. उन्हातून आल्यावर थेट एसीच्या थंड हवेने शरीर थंड करण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, असा सल्ला ते देतात.
35
आपलं शरीर तापमान कसं नियंत्रित करतं?
आपलं शरीर बाहेरील तापमानानुसार स्वतःला जुळवून घेतं. जेव्हा आपण उन्हात असतो, तेव्हा शरीर घाम आणि रक्तवाहिन्या प्रसरण पावण्याच्या (vasodilation) प्रक्रियेद्वारे उष्णतेचा सामना करतं. या प्रक्रियेमुळे शरीर आपलं तापमान संतुलित ठेवतं. ही आपल्या शरीरातील एक नैसर्गिक संरक्षण प्रणाली आहे.
जेव्हा आपण उन्हातून येऊन अचानक कमी तापमानाच्या एसी रूममध्ये जातो, तेव्हा शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली बिघडते. तापमानातल्या या अचानक बदलामुळे शरीराची सिस्टीम गोंधळून जाते. यामुळे सर्दी, खोकला, तीव्र डोकेदुखी आणि स्नायूदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही, तर याचा आपल्या रोगप्रतिकारशक्तीवरही गंभीर परिणाम होतो.
55
मग उन्हातून आल्यावर काय करायला हवं?
उन्हातून घरी किंवा ऑफिसमध्ये आल्यावर, आधी थोडा वेळ सावलीत किंवा फॅनखाली बसा. शरीराचं तापमान थोडं सामान्य झाल्यावरच एसी रूममध्ये जाणं सुरक्षित आहे. तसंच, उन्हातून आल्यावर लगेच खूप थंड पाणी पिणंही चांगलं नाही. शरीराला जास्त उष्णतेतून थेट जास्त थंडीत नेणं योग्य नाही. त्यामुळे थोडा वेळ थांबल्यास तुम्ही आजारपणाला दूर ठेवू शकता.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .