Health Alert: उन्हाळ्यात एसीशिवाय जगणं कठीण आहे, असं अनेक जण म्हणतात. पण सतत एसीमध्ये राहणाऱ्यांना त्यामुळे होणारे धोके अनेकदा माहीत नसतात. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या लेखामधून
आजकाल एसी ही चैनीची वस्तू राहिलेली नाही, तर ती एक गरज बनली आहे. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांना एसीशिवाय एक क्षणही करमत नाही. पण हाच एसी तुमच्या त्वचेचं नुकसान करतोय, हे तुम्हाला माहीत आहे का?
25
एसीमुळे कोरडेपणा आणि डिहायड्रेशन
कोरडेपणा आणि डिहायड्रेशन: एसी खोली थंड करण्यासाठी हवेतील ओलावा काढून टाकतो. हवेतील ओलावा कमी झाल्यामुळे तुमच्या त्वचेच्या नैसर्गिक संरक्षण थरावर परिणाम होतो. यामुळे त्वचा ताणल्यासारखी वाटणे, त्वचा निघणे, खाज सुटणे, निस्तेज होणे आणि त्वचा खडबडीत होणे अशा समस्या उद्भवतात.
वाढलेली संवेदनशीलता: कोरड्या त्वचेवर जळजळ आणि ॲलर्जी सहज होते. एसी असलेल्या घरात किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवल्यास ॲलर्जी, अस्थमा, मुरुमे आणि 'लिजनियर्स डिसीज' (Legionnaires' disease) सारखे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
35
त्वचेच्या समस्या वाढतात
त्वचेवर लवकर सुरकुत्या: जे लोक जास्त वेळ एसीमध्ये बसतात, त्यांच्या चेहऱ्यावर लवकर म्हातारपणाची लक्षणं दिसू लागतात. हवेत ओलावा नसल्यामुळे त्वचा तिची स्निग्धता (fat content) गमावते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा वेळेआधीच स्पष्ट दिसू लागतात.
त्वचेच्या समस्या वाढतात: ज्यांना आधीपासून सोरायसिस (psoriasis) किंवा लायकेन प्लॅनस (lichen planus) सारखे ऑटो-इम्यून त्वचारोग आहेत, त्यांनी जास्त वेळ एसीजवळ बसल्यास या समस्या आणखी गंभीर होऊ शकतात. कोरडी हवा त्वचेच्या अशा आजारांना आणखी वाढवते.
तुमच्या त्वचेचं आरोग्य हे तुमच्या शरीराच्या आरोग्याचं पहिलं लक्षण आहे. त्यामुळे दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्या. उष्ण दिवसांमध्ये शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि लिंबू सरबत प्या.
एसीऐवजी कूलर वापरण्याचा विचार करू शकता, कारण तो हवेत जास्त ओलावा टिकवून ठेवतो.
दुसरा एक सोपा उपाय म्हणजे तुमच्या खोलीत एका उघड्या भांड्यात पाणी भरून ठेवा. यामुळे हवेत ओलावा वाढेल आणि कोरड्या त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होईल.
त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. ग्लिसरीन, हायलुरोनिक ॲसिड आणि सेरामाइड असलेले मॉइश्चरायझर निवडा.
55
त्वचेचं आरोग्य
चमकदार आणि सतेज त्वचेसाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन (विशेषतः ए, सी आणि ई) यांनी युक्त हंगामी फळे आणि पदार्थ खा. पुरेशी झोप घ्या. कापरामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने तो त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. घरात कापूर जाळू शकता. ऑक्सिजन वाढवणारी झाडं एसी असलेल्या खोलीत किंवा तुमच्या आजूबाजूला ठेवा. ती तुम्हाला चांगला श्वास घेण्यास मदत करतील आणि हवेत ओलावादेखील वाढवतील. आंघोळीसाठी नेहमी कोमट पाणी वापरा आणि जास्त वेळ आंघोळ करणे टाळा.