Gold Rate Today : सोने - चांदी दरात घसरण, किती आहे आजचा १० ग्रॅमचा भाव?

Published : Jul 15, 2026, 04:38 PM IST
Gold Silver Rate Today

सार

Gold-Silver Rate Today : सोने-चांदीच्या किमतीत सतत परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. आज भारतीय बाजारात किती आहे एक तोळ्याचा सोन्याचा दर?

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने - चांदी दरात सतत चढ-उतार होत आहेत. आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने-चांदीतील ही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अनेक घडामोडींच्या मौल्यवान धातूच्या किमतीवर परिणाम होताना दिसतो आहे.

किती आहे आजचा बाजारातील सोने-चांदी दर?

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने - चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत आज बुधवारी, १५ जुलै रोजी ७७० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढीसह सोन्याचा आजचा २४ कॅरेटचा १० ग्रॅमचा भाव १,४३,५७० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दरात आज ७०० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर सोन्याचा २२ कॅरेटचा भाव १,३१,६०० रुपयांवर पोहोचला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ५७० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा एक तोळ्याचा १८ कॅरेटचा भाव १,०७,६७० रुपये इतका आहे.

सोने दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण, तर भारतीय बाजारात वाढ झाली आहे. मात्र चांदीचा भाव स्थिर आहे. आज १५ जुलै रोजी, बुधवारी चांदीचा दर २,३५,००० रुपये इतका आहे.

सोने दर कमी का झाला? काय आहेत कारणं?

इराण आणि अमेरिका या दोन देशांतील संघर्ष कमी होत नाहीये. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. याचा संपूर्ण जगभरातच मोठा परिणाम होतोय. इराण-अमेरिकेतील युद्ध सुरूच असल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या वाढत्या किमतींमुळे महागाईदेखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे अमेरिकेतील बँकांचे व्याजदर वाढतील, अशीही गुंतवणुकदारांना भीती आहे. या गोष्टींचा एकत्रित परिणाम शेअर बाजारातील व्यवहारांवर होताना दिसतो.

कच्च्या तेलाचे वाढते दर, व्याजदारांबाबतची चिंता, शेअर बाजारातील अनिश्चितता अशा गोष्टींचा परिणाम मौल्यवान धातूवर होत आहे. त्यामुळेच सोन्याची मागणी कमी झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सोने हा महागाईपासून संरक्षण देणारा, सुरक्षित ठेवणारा पर्याय म्हणून पाहिलं जातं. मात्र वाढत्या व्याजदरांच्या भीतीमुळे त्याची मागणी कमी होते. त्यामुळेच सोने - चांदी दरात आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण झाली असल्याचं, तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर