Gold-Silver Rate Today : दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदीचा दर पुन्हा वाढला, काय आहे आजचा गोल्ड रेट?

Published : Jul 14, 2026, 06:18 PM IST
Gold Silver Rate

सार

Gold Silver Rate Today 14 July : सोने-चांदीच्या दरात मागील अनेक दिवसांपासून सतत चढ-उतार होत आहेत. आज भारतीय बाजारात काय आहे सोने-चांदीचा एक तोळ्याचा भाव?

मुंबई : सोने - चांदीच्या किमती मागील आठवडा सतत कमी झाल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवसही सोने-चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र आज आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळवारी मौल्यवान धातूच्या किमतीत वाढ झाली आहे.

सराफा बाजारात सोने दरात घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात वाढ झाली आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात सोने दरात काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव स्थिर आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ११० रुपयांनी घसरला आहे. या घसरणीसह सोन्याचा आजचा १० ग्रॅमचा भाव १,४२,८०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दरही आज १०० रुपयांनी उतरला आहे. त्यामुळे २२ कॅरेटचा सोन्याचा एक तोळ्याचा आजचा दर १,३०,९०० प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ८० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सोनं दर १,०७,१०० रुपये इतका आहे.

तर चांदीचा भाव २,३५,००० रुपये इतका आहे. आज चांदीचा भाव स्थिर आहे. या धातूच्या किमतीत कोणतेही चढ-उतार आज झालेले नाहीत.

सोने-चांदी दरातील चढ-उतारामागे कारण काय?

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोने-चांदी दरावर परिणाम होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्या संघर्ष हा सोने-चांदीच्या सततच्या चढ-उतारामागील सर्वात मोठं कारण ठरतं आहे. तसंच महागाईदेखील वाढण्याच्या शक्यतेमुळे चिंता निर्माण झाली आहे. अमेरिका - इराण या दोन देशांमधील संघर्षाशिवाय कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, डॉलरची वाढती मजबूती हीदेखील कारण सोने-चांदी दरवाढ, तसंच मौल्यवान धातूच्या चढ-उतार होण्यामागे आहेत. डॉलर मजबूत झाल्याने शेअर बाजारावर याचा परिणाम होताना दिसतो. शेअर बाजारातील दबावामुळेही सोन्यात चढ-उतार होताना दिसतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Toe Rings: खड्यांच्या जोडव्यांचा हटके ट्रेंड, पायांची सुंदरता वाढवणारे 10 बेस्ट डिझाइन्स!
Royal Enfield: अमेरिकेत कितीला मिळते बुलेट? नेमका किंमतीत फरक किती?