Gold Rate Today : हरितालिकेला सोन्यात दरात तेजी, वाचा मुंबईसह राज्यातील या शहरांमधील दर

Published : Aug 26, 2025, 11:06 AM IST

मुंबई : आज सोन्याच्या बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,०१,१५० रुपयांवर पोहोचली आहे, तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ९२,७२१ रुपये इतका झाला आहे. जाणून घ्या राज्यातील इतर शहरांमधील सोन्याचे दर… आणि चांदिचे दर 

PREV
14
चांदिचे दर जाणून घ्या

चांदीच्या दरातही चढ-उतार असून १ किलो चांदीची किंमत १,१६,८०० रुपये, तर १० ग्रॅम चांदीची किंमत १,१६८ रुपये निश्चित झाली आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या किमती ठरवताना उत्पादन शुल्क, राज्य सरकारचे कर तसेच मेकिंग चार्जेसचा मोठा फरक पडतो. त्यामुळे एकाच दिवशी देशभरातील वेगवेगळ्या शहरांत सोन्याचे दर थोडेफार बदलताना दिसतात.

24
प्रमुख शहरांतील दर

मुंबई : २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९२,५५६ रुपये, २४ कॅरेट सोने १,००,९७० रुपये

पुणे : २२ कॅरेट सोने ९२,५५६ रुपये, २४ कॅरेट सोने १,००,९७० रुपये

नागपूर : २२ कॅरेट सोने ९२,५५६ रुपये, २४ कॅरेट सोने १,००,९७० रुपये

नाशिक : २२ कॅरेट सोने ९२,५५६ रुपये, २४ कॅरेट सोने १,००,९७० रुपये

34
२२ कॅरेट आणि २४ कॅरेटमधील फरक

सोने खरेदी करताना अनेकदा ग्राहकांना २२ कॅरेट घ्यायचे की २४ कॅरेट, असा प्रश्न पडतो.

२४ कॅरेट सोने हे ९९.९ टक्के शुद्ध मानले जाते. मात्र शुद्धतेमुळे त्याचे दागिने बनविणे शक्य नसते.

२२ कॅरेट सोने हे सुमारे ९१ टक्के शुद्ध असून त्यात उर्वरित ९ टक्के तांबे, चांदी, जस्त यांसारख्या धातूंचे मिश्रण केले जाते. त्यामुळे त्यापासून दागिने बनवणे शक्य होते.

म्हणूनच दागिन्यांच्या खरेदीसाठी सराफ दुकानदार प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्यालाच प्राधान्य देतात.

44
सणासुदीला विक्री वाढते

भारत आणि चीनमध्ये सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढते. ही मागणी वाढल्यास सोन्याचा भावही स्वाभाविकपणे वाढतो. त्याचप्रमाणे, मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढतात.

एकंदरीत, डॉलरची घसरण, व्याजदरातील कपात, महागाई वाढ, जागतिक राजकीय/आर्थिक अस्थिरता, तेलाच्या किमतीत वाढ, भारत-चीनमधील लग्नसराईच्या काळातील मागणी, मध्यवर्ती बँकांची खरेदी वाढणे ही सोन्याच्या भावात वाढ होण्याची प्रमुख कारणे आहेत.

Read more Photos on

Recommended Stories