Gold Buying Guide: सोनं खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा, फसवणूक टाळा!

Published : Mar 31, 2026, 10:48 PM IST

Gold Buying Guide: सोनं खरेदी करणं हे अनेकांसाठी एक मोठी गुंतवणूक असते. पण योग्य माहिती नसल्यास, छोट्याशा चुकीमुळेही मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच, सोनं खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी आणि फसवणूक कशी टाळावी, हे इथे सोप्या भाषेत समजून घेऊया.

PREV
17
सोनं खरेदी करताना घ्यायची काळजी
सोनं खरेदी करताना सर्वात आधी BIS हॉलमार्क नक्की तपासा. देशात सोन्याच्या शुद्धतेची हमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) देते. हा हॉलमार्क नसेल तर सोनं खरेदी करू नका. 22 कॅरेटसाठी 916 आणि HUID क्रमांक असणं आवश्यक आहे. हे नसेल, तर ते सोनं बनावट किंवा कमी शुद्धतेचं असू शकतं.
27
बिल घेणं बंधनकारक
सोनं खरेदी करताना नेहमी GST बिल घ्या. बिल नसेल, तर सोनं विकताना किंवा एक्सचेंज करताना अडचणी येतात. काही दुकानं 5% ते 25% पर्यंत मेकिंग चार्जेस लावतात. कमी किंमत सांगून जास्त मेकिंग चार्ज लावणं ही एक सामान्य युक्ती आहे. त्यामुळे खरेदीपूर्वी एकूण किमतीचं ब्रेकअप नक्की मागा.
37
22 कॅरेट आणि 24 कॅरेटमधील फरक समजून घ्या
24 कॅरेट सोनं गुंतवणुकीसाठी वापरतात, जे बिस्किट किंवा कॉइनच्या स्वरूपात मिळतं. तर 22 कॅरेट सोनं दागिन्यांसाठी वापरतात. अनेकदा दुकानदार 22 कॅरेट दागिन्यांवर 24 कॅरेटचा भाव लावतात. त्यामुळे खरेदीवेळी हे नक्की तपासा.
47
वजन तपासून घ्या
खडे किंवा मोती असलेल्या दागिन्यांचं वजन जास्त भरतं. अनेकदा या खड्यांच्या वजनावरही सोन्याचाच भाव लावला जातो. हे लक्षात घेऊन, दागिन्यातील निव्वळ सोन्याचं वजन (Net Gold Weight) आवर्जून विचारा. तसेच, बाजारात सोन्याचा रोजचा भाव काय आहे, हे तपासूनच दुकानात जा.
57
या गोष्टींमध्येही होऊ शकते फसवणूक
स्थानिक दुकानदार हॉलमार्कशिवाय कमी किमतीत सोनं विकतात, पण विकताना त्याची किंमत कमी मिळते. काहीजण कमी दराचं आमिष दाखवून मेकिंग चार्जेस आणि घट (Wastage) या नावाखाली जास्त पैसे उकळतात. खड्यांच्या दागिन्यांमध्ये तर खड्यांना सोन्याच्या भावात मोजून बिल वाढवलं जातं.
67
हे आहेत फसवणुकीचे मोठे प्रकार
जुनं सोनं बदलून घेताना अनेकदा फसवणूक होते. सोनार तुमच्या सोन्याची शुद्धता कमी सांगून त्याची किंमत कमी करतो. अनेकदा मशीनशिवाय अंदाजे तपासणी करून फसवतात. सोशल मीडियावरील बनावट जाहिरातींना बळी पडू नका. 'नो मेकिंग चार्जेस' सारख्या ऑफर्समध्ये एकतर दर जास्त असतो किंवा सोन्याची शुद्धता कमी असते.
77
निष्काळजीपणा करू नका
सुरक्षित खरेदीसाठी नेहमी नामांकित आणि विश्वासार्ह ज्वेलर्सकडूनच सोनं घ्या. बिल आणि हॉलमार्कचा आग्रह धरा. खरेदी करण्यापूर्वी दोन-तीन दुकानांमध्ये दरांची तुलना करा. सोनं खरेदी ही गुंतवणूक आहे, त्यामुळे निष्काळजीपणा केल्यास मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून हॉलमार्क, बिल, वजन आणि मेकिंग चार्जेस सर्व गोष्टी तपासूनच खरेदी करा.
Read more Photos on

Recommended Stories