Gardening Tips: कडीपत्त्याचं झाड वाढत नाहीये? घरातली 'ही' एक गोष्ट वापरा, झाड होईल हिरवंगार

Published : May 31, 2026, 03:21 PM IST
Gardening Tips: कडीपत्त्याचं झाड वाढत नाहीये? घरातली 'ही' एक गोष्ट वापरा, झाड होईल हिरवंगार

सार

तुमच्याही घरातलं कडीपत्त्याचं झाड सुकतंय किंवा त्याला नवी पानं फुटत नाहीत का? मग टेन्शन घेऊ नका. एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं सांगितलेली ही सोपी ट्रिक वापरा आणि पाहा कमाल. जाणून घ्या कडीपत्त्याच्या झाडाची वाढ कशी करायची.

Curry Leaf Plant Care: कडीपत्ता किंवा गोडलिंबाचं झाड आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी असतंच. कुणी ते बागेत लावतं तर कुणी कुंडीत. पण अनेकदा अशी तक्रार येते की घरात लावलेलं कडीपत्त्याचं झाड सुकलं किंवा त्याला नवीन पानंच येत नाहीयेत. पण तुम्हाला माहीत आहे का? थोडीशी मेहनत आणि तुमच्या स्वयंपाकघरातलीच एक खास गोष्ट वापरून तुम्ही घरच्या कडीपत्त्याच्या झाडाला पुन्हा हिरवंगार आणि दाट करू शकता. चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

कडीपत्त्याच्या झाडाची काळजी कशी घ्यावी?

जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेक जण फोडणीत कडीपत्ता हमखास वापरतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात कडीपत्त्याचं झाड बघायला मिळतं. पण, अनेकांची तक्रार असते की त्यांच्या घरचं झाड कोमेजून गेलंय, सुकलंय किंवा त्याला नवी पानं फुटत नाहीयेत. याच समस्येवर बागकाम तज्ज्ञ (Gardening Expert) आणि माजी लष्करी अधिकारी (Ex-Army Major) डॉ. मयूर मंडराह यांनी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत. त्यांनी सांगितलेले उपाय वापरल्यास घरातलं कडीपत्त्याचं झाड एखाद्या मोठ्या झुडपासारखं घनदाट दिसेल. चला, पाहूया काय आहेत हे सोपे उपाय...

 

1. कडीपत्त्याच्या मुळांना पसरायला भरपूर जागा लागते. त्यामुळे, घरात झाड लावण्यासाठी कमीत कमी १० ते १२ इंच आकाराची कुंडी असावी. प्लॅस्टिकऐवजी मातीची कुंडी वापरली तर जास्त चांगलं, कारण त्यात ओलावा टिकून राहतो. झाड लावण्यापूर्वी कुंडीच्या तळाशी एक छिद्र नक्की आहे की नाही हे तपासा, जेणेकरून जास्तीचं पाणी बाहेर वाहून जाईल.

2. कडीपत्त्याचं झाड लावण्यासाठी अशी माती वापरा जी ओलावा शोषून घेईल पण पाणी साठू देणार नाही. यासाठी ५० टक्के बागेतील साधी माती, ३० टक्के कोकोपीट (नारळाचा भुसा) आणि २० टक्के वाळू वापरा. अशा प्रकारच्या मिश्र मातीत झाड लावल्यास कुंडीत पाणी साचणार नाही आणि मुळांना ऑक्सिजनही मिळत राहील.

3. बागकाम तज्ज्ञांच्या मते, कडीपत्त्याच्या झाडासाठी रासायनिक खतं वापरू नयेत. त्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील ताक वापरू शकता. दोन-तीन दिवस जुनं झालेलं आंबट ताक एका लहान बादलीभर पाण्यात मिसळून ते पाणी कुंडीत घाला. थोडं ताकाचं पाणी पानांवरही शिंपडा. यामुळे झाडाला लागणारी बुरशी किंवा कीड नाहीशी होईल आणि झाडाची वाढ दुप्पट वेगाने होईल.

 

4. बागकाम तज्ज्ञांच्या मते, कडीपत्त्याचं झाड जसजसं वाढतं, तसतशी त्याला पांढरी फुलं आणि बिया येऊ लागतात. झाडाची वाढ चांगली होण्यासाठी या बिया आणि फुलं लगेच काढून टाका. जर तुम्ही ते काढले नाही, तर झाडाची सगळी ऊर्जा फुलं आणि बिया वाढवण्यातच खर्च होईल आणि पानांची वाढ खुंटेल.

 

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर