FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह १५० कंपन्यांना दणका; FSSAI ची मोठी कारवाई

Published : Aug 23, 2026, 03:21 PM IST
FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह १५० कंपन्यांना दणका; FSSAI ची मोठी कारवाई

सार

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने एक मोठी कारवाई केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीची माहिती दिल्याबद्दल नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह १५० हून अधिक कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ॲमेझॉन, डॉमिनोजसारख्या कंपन्यांवरही परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : भारताची अन्न सुरक्षा नियामक संस्था, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने अनेक मोठ्या फूड आणि बेव्हरेज कंपन्यांवर कडक कारवाई केली आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनांवर चुकीची माहिती दिल्याबद्दल नेस्ले इंडिया, पेप्सिको, कोका-कोला यांसारख्या मोठ्या कंपन्यांना दणका दिला आहे. FSSAI ने एकूण १५० हून अधिक कंपन्यांना नोटीस बजावली आहे. अलीकडच्या काळात बाजारात केलेल्या तपासणीचा तपशील FSSAI ने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या मोठ्या ब्रँड्सवर झाली कारवाई

नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोला व्यतिरिक्त, ॲबॉट इंडिया, रेड बुल, डॅनोन, मॉन्स्टर एनर्जी, हेल एनर्जी, मॉन्डेलेझ (कॅडबरी), डियाजिओ, Pernod Ricard, फेरेरो इंडिया आणि केनवू यांसारख्या कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेषतः एनर्जी ड्रिंक्स आणि अल्कोहोलिक पेये बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नियमांचे उल्लंघन जास्त प्रमाणात आढळले आहे.

याशिवाय, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सना १२ नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इतकंच नाही, तर ॲमेझॉनच्या एका वेअरहाऊसचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. केएफसी, मॅकडोनाल्ड्स, पिझ्झा हट, डॉमिनोज आणि कोस्टा कॉफी यांसारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन्सना ३० हून अधिक नोटीस देण्यात आल्या. नियमांचे पालन न केल्यामुळे डॉमिनोजचे ५ परवाने FSSAI ने निलंबित केले आहेत.

FSSAI ने स्पष्ट केलं आहे की, गेल्या काही वर्षांत फाईव्ह-स्टार हॉटेल्सवरही अशीच कारवाई करण्यात आली होती. नोटीस मिळाल्यानंतर अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या चुका सुधारण्यास सुरुवात केली आहे, असंही FSSAI ने म्हटलं आहे.

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

BigFlix: भारतात २००८ मध्येच सुरू झाला होता OTT प्लॅटफॉर्म! तुम्हाला माहितीये का ही गोष्ट?
Mahindra XUV 3XO CNG: महिंद्रा XUV 3XO मध्ये होणार मोठा बदल?