लिव्हरचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि फॅटी लिव्हरचा धोका नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे नियमित जेवणात कोणता आहार समाविष्ट करावा याबद्दची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
लिव्हरचे आरोग्य राखण्यात आणि फॅटी लिव्हरचा धोका नियंत्रित करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. संतुलित आहार लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करतो. निरोगी लिव्हर शरीरासाठी आवश्यक आहे.
210
लिव्हरचे आजार टाळण्यासाठी काय खावे? डॉ. सौरभ सेठी सांगतात
फॅटी लिव्हर, विशेषतः NAFLD, आजकाल सामान्य झाला आहे. जास्त कॅलरी, साखरयुक्त आहार आणि बैठी जीवनशैलीमुळे याचा धोका वाढतो. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळून पौष्टिक आहार घेणे फायदेशीर आहे.
310
लिव्हरचे आजार टाळण्यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल उत्तम आहे
लिव्हरचे आजार टाळण्यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल उत्तम आहे. यात हेल्दी मोनोसॅचुरेटेड फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करते.
पुन्हा गरम केलेले तेल वापरणे टाळा, यामुळे लिव्हरचे नुकसान होऊ शकते
पुन्हा गरम केलेले तेल वापरणे टाळावे. कारण तेल पुन्हा गरम केल्यावर त्यात हानिकारक घटक तयार होतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते.
510
नट्स आणि बिया लिव्हरच्या आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त
नट्स आणि बिया, विशेषतः बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि जवस हे फॅटी लिव्हरसाठी उत्तम स्नॅक्स आहेत. यामध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रथिने असतात, जे वजन नियंत्रणात ठेवतात.
610
अल्ट्रा-प्रोसेस्ड पॅक केलेले पदार्थ लिव्हरच्या आरोग्यासाठी हानिकारक
अल्ट्रा-प्रोसेस्ड पॅक केलेले पदार्थ लिव्हरच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. या पदार्थांमध्ये साखर आणि अस्वस्थ चरबी असते. यामुळे वजन वाढते आणि लिव्हरमध्ये चरबी जमा होते.
710
ओट्स आणि बार्लीसारखी धान्ये फॅटी लिव्हरसाठी फायदेशीर आहेत
ओट्स आणि बार्लीसारखी धान्ये फॅटी लिव्हरसाठी फायदेशीर आहेत. या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समध्ये भरपूर फायबर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
810
पांढरा ब्रेड आणि पेस्ट्रीसारखे पदार्थ खाणे टाळावे
पांढरा ब्रेड आणि पेस्ट्रीसारखे पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. रिफाइंड कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी वाढवतात, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ शकते.
910
फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सयुक्त आहारावर लक्ष केंद्रित करा
निरोगी वजन राखण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. थोडे वजन कमी केल्यानेही लिव्हरमधील चरबी कमी होते. फळे, भाज्या, प्रथिने आणि हेल्दी फॅट्सयुक्त आहार घ्या.
1010
दिवसभर भरपूर पाणी प्या
दिवसभर भरपूर पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने लिव्हरचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. जास्त मद्यपान केल्याने लिव्हर खराब होऊ शकते.