तळलेले पदार्थ:
तेलात तळलेल्या पदार्थांमध्ये भरपूर चरबी आणि तेल असल्याने ते मुलांसाठी खूपच हानिकारक असतात. म्हणून हिवाळ्यात समोसा, वडे यांसारख्या तेलात तळलेल्या पदार्थांपासून तुमच्या मुलांना दूर ठेवा.
दुग्धजन्य पदार्थ:
हिवाळ्यात चीज, क्रीम सारखे दुग्धजन्य पदार्थ मुलांना देऊ नका. कारण त्यात प्राण्यांचे प्रथिने जास्त असल्याने ते मुलांमध्ये कफ वाढवू शकतात. यामुळे कधीकधी मुलांची प्रकृती बिघडू शकते. म्हणून हिवाळा संपेपर्यंत मुलांना दुग्धजन्य पदार्थ देणे कमी करा आणि त्याऐवजी हिवाळ्यासाठी योग्य असा आहार द्या.
याशिवाय, हिवाळ्यात मुलांना मशरूम, पालक, सोया सॉस, पपई, आंबट पदार्थ, दही, लोणचे यांसारखे पदार्थ देणे टाळावे.