Lava Prowatch Xtreme Smartwatch फक्त ₹१६ मध्ये, मिळवा ₹४४९९ किमतीचे स्मार्टवॉच!

Published : Jun 16, 2025, 03:43 PM IST
Lava Prowatch Xtreme Smartwatch फक्त ₹१६ मध्ये, मिळवा ₹४४९९ किमतीचे स्मार्टवॉच!

सार

लावा प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉच फक्त ₹१६ मध्ये उपलब्ध! ₹४४९९ किमतीचे स्मार्टवॉच आत्ताच खरेदी करा.

मुंबई  : तुम्हाला स्मार्टवॉच घालायची इच्छा आहे का? काही लोकांना आठवड्याचे सातही दिवस वेगवेगळे स्टायलिश घड्याळे घालायची असतात. तर काहींना ब्रँडेड घड्याळ्यांवर प्रेम असते. अशा परिस्थितीत ही बातमी तुम्हाला नक्कीच आनंद देईल. ब्रँडेड आणि स्टायलिश घड्याळ तुमचे करण्याची सुवर्णसंधी आली आहे. लावा कंपनीने आपले प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉच लाँच केले आहे, ज्याची किंमत ४,९९९ रुपयांपासून सुरू होते.

प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉचचे विक्री आजपासून (१६ जून) सुरू होईल. हे महागडे घड्याळ तुम्ही फक्त १६ रुपयांमध्ये तुमचे करू शकता. फक्त १६ रुपयांमध्ये सुंदर घड्याळ कसे मिळवायचे ते पाहूया.

प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉच Amazon वर १६ जून रोजी दुपारपासून ग्राहकांना मिळेल. प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉचवर कंपनीने विशेष ऑफर जाहीर केली असून, पहिले ५० ग्राहक प्रोवॉच एक्सट्रीमचे सिलिकॉन व्हेरियंट फक्त १६ रुपयांमध्ये ऑर्डर करू शकतात. ऑर्डर करणारे पहिले ५० ग्राहक हे घड्याळ खरेदी करू शकतील. १६ रुपयांमध्ये घड्याळ मिळवू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी चेकआउट करताना XTREME16 कूपन कोड वापरावा लागेल.

लावा कंपनीने सिलिकॉन, नायलॉन आणि मेटल अशा तीन व्हेरियंटमध्ये प्रोवॉच एक्सट्रीम स्मार्टवॉच लाँच केले आहे. सिलिकॉन व्हेरियंटची किंमत ४,४९९ रुपये आहे. १६ जून रोजी ग्राहक ते फक्त ३,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. म्हणजेच १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. नायलॉन व्हेरियंटवरही सूट दिली जात आहे. ४,६९९ रुपयांचे नायलॉन ग्राहक ४,१९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. मेटल व्हेरियंटची किंमत ४,९९९ रुपये असून ते ४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय, ग्राहकांना सर्व व्हेरियंटवर १,००० रुपयांची बँक ऑफरही मिळेल.

 

 

 

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सॅमसंगचा हा फोन चंद्रावर जाणार, स्पेसिफिकेशन वाचून येईल चक्कर
बाळ घरातून जाताना आवाज येईल छुमछुम, बारशाला गिफ्ट करा हे खास पैंजण