या महिन्यात अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात बदल केले आहेत. फेडरल बँक, कर्नाटक बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, आरबीएल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या बँकांनी व्याजदरात सुधारणा केल्या आहेत. या बँकांचे नवीन व्याजदर जाणून घेऊया.
१) फेडरल बँक
३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवींसाठी फेडरल बँकेने व्याजदर सुधारित केले आहेत. सामान्य नागरिकांसाठी ३% ते ७.४% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५% ते ७.९% पर्यंत व्याजदर आहेत. ७ दिवस ते २९ दिवसांच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना ३.००% आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५०% व्याज मिळेल. २ वर्ष ते ७७६ दिवसांच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना ७.१५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.६५% व्याज मिळेल. ५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर ६.६०% ते ७.२५% पर्यंत व्याज मिळेल.
२) आरबीएल बँक
सामान्य नागरिकांना ३.५०% ते ८% पर्यंत, ज्येष्ठ नागरिकांना ८.५०% आणि अतिज्येष्ठ नागरिकांना ८.७५% पर्यंत व्याज आरबीएल बँक देईल. ७ दिवस ते २९ दिवसांच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना ३.५०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ४% व्याज मिळेल.
३) कर्नाटक बँक
३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवर सामान्य नागरिकांना ३.५% ते ७.५% आणि ज्येष्ठ नागरिकांना ३.५% ते ८% पर्यंत व्याज कर्नाटक बँक देईल.
७ दिवस ते ४५ दिवसांच्या ठेवींवर ३.५%, ४६ दिवस ते ९० दिवसांच्या ठेवींवर ४%, ९१ दिवस ते १७९ दिवसांच्या ठेवींवर ५.२५%, १८० दिवस ते १ वर्षाच्या ठेवींवर ६.२५% असे इतर व्याजदर आहेत.
४) बँक ऑफ महाराष्ट्र
बँक ऑफ महाराष्ट्र, ३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना २.७५% ते ७.३५% आणि ज्येष्ठ नागरिकांना २.७५% ते ७.८५% पर्यंत व्याज देईल.
५) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, ३ कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर सामान्य नागरिकांना ३.५०% ते ८.२५% आणि ज्येष्ठ नागरिकांना २.७५% ते ९% पर्यंत व्याज देईल.