
नवी दिल्ली : EPFOच्या (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) कोट्यवधी सदस्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. 2024-25 आर्थिक वर्षासाठीची पीएफवरील व्याज रक्कम अखेर खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील जवळपास ७ कोटी सदस्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली असून, उर्वरित थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे.
वित्त मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी EPF व्याजदर जाहीर केला होता. त्यानंतर फक्त दोन महिन्यांच्या आत ही रक्कम खात्यात जमा करण्यात आली आहे. ९९.९% कंपन्यांची आणि ९६.५१% खात्यांची वार्षिक अपडेटिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. उर्वरित खात्यांमध्येही या आठवड्यात व्याज जमा होणार आहे.
३३.५६ कोटी खात्यांची अपडेट प्रक्रिया
१३.८८ लाख कंपन्या व संस्थांचा सहभाग
८ जुलै २०२५ पर्यंत – ३२.३९ कोटी खात्यांमध्ये व्याज जमा
याचा अर्थ जवळपास सर्व EPFO सदस्यांनी आपला पीएफ बॅलन्स वाढलेला अनुभवण्याची शक्यता आहे.
EPFO ने सदस्यांसाठी बॅलन्स तपासण्याचे अनेक सोपे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत
1. मिस कॉलद्वारे बॅलन्स तपासणे
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून खालील क्रमांकावर मिस कॉल द्या:
011-22901406
काही सेकंदांतच तुमच्या खात्याचा बॅलन्स SMS द्वारे मिळेल.
2. SMSद्वारे माहिती मिळवा
तुमच्या मोबाईलमधून हा मेसेज पाठवा:
EPFOHO UAN ENG
पाठवा या क्रमांकावर: 7738299899
(‘ENG’ म्हणजे इंग्रजीसाठी. तुम्हाला हवी असल्यास MAR लिहा मराठीसाठी)
3. UMANG App किंवा EPFO Portal वापरा
UMANG App डाउनलोड करा
किंवा EPFO Portal वर लॉगिन करून खात्याची माहिती मिळवा
पीएफ धारकांसाठी ही एक सकारात्मक आणि आर्थिक दृष्टिकोनातून दिलासादायक बातमी आहे. वर्षभराच्या वाट पाहणीनंतर तुमच्या बचतीवर मिळालेलं व्याज आता तुमच्या हक्काच्या खात्यात जमा झालं आहे. बॅलन्स तपासून तुमचा निधी अपडेट झालाय का हे आजच जाणून घ्या!