Gardening Tips: घरात जागा कमीये? तरीही वर्षभर मिळेल ताजी कोरफड, कुंडीत लावण्याची सोपी पद्धत!

Published : Jun 08, 2026, 05:37 PM IST
Gardening Tips

सार

Gardening Tips घरात कमी जागेत कोरफड कशी लावावी? त्वचा आणि केसांसाठी तिचे काय फायदे आहेत? आणि या रोपाला किती ऊन आणि पाणी लागतं? जाणून घ्या काही सोप्या टिप्स.

कोरफडीचा गर (जेल) फक्त आरोग्यासाठीच नाही, तर त्वचा आणि केसांसाठीही एक वरदान आहे. तुमच्या घरात जागा कमी असली तरी तुम्ही कोरफडीचं रोप लावू शकता. यात अनेक औषधी गुणधर्म आहेत आणि वर्षभर तुम्हाला भरपूर गर मिळेल. जर तुम्हाला घरी कोरफडीचं रोप लावायचं असेल, तर या काही सोप्या टिप्स नक्की फॉलो करा. कमी जागेत कुंडीमध्ये तुम्ही सहज कोरफड लावू शकाल.

कोरफडीचं छोटं रोप निवडा

घरात जागा कमी असेल, तर कोरफडीचं एक छोटं रोप निवडा. नर्सरीमध्ये तुम्हाला ते सहज आणि कमी किमतीत मिळेल. किंवा कुणाच्या घरी कोरफडीचं मोठं झाड असेल, तर त्याच्या आजूबाजूला आलेली छोटी रोपंही तुम्ही आणू शकता. यासाठी एक मध्यम आकाराची कुंडी निवडा आणि त्यात साधी माती, थोडी वाळू आणि खत मिसळून रोपासाठी तयार करा.

 

काही तासांचं ऊन गरजेचं

तुमच्या घरात जागा कमी असली तरी, कोरफडीच्या कुंडीला अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातून काही तास ऊन मिळेल. या रोपाला थोड्या उन्हाची गरज असते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी दिलं तरी पुरेसं आहे. म्हणजेच, कोरफड वाढवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. पुरेसं ऊन मिळालं की रोप झपाट्याने वाढतं आणि त्याची पानं हिरवीगार राहतात.

जुनी पानं कापून वापरा

जेव्हा कोरफडीची पानं मोठी होतील, तेव्हा बाहेरची आणि सगळ्यात जुनी पानंच कापा. एका वेळी रोपाची २० ते ३० टक्क्यांपेक्षा जास्त पानं काढू नका. पानं हाताने तोडण्याऐवजी सुरीने कापा. योग्य ऊन आणि पाणी मिळालं की कोरफडीला पुन्हा नवीन पानं फुटायला लागतात.

 

 

PREV
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

PhonePe, G Pay की Paytm... लोक सर्वात जास्त कोणतं अ‍ॅप वापरतात माहितीये?
Before Investing in a Mutual Fund : म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा