उन्हाळ्यात दूध फाटण्याची चिंता सोडा, वापरा या 5 सोप्या टिप्स, दूध राहील एकदम फ्रेश

Published : Mar 18, 2026, 09:13 AM IST

Easy Kitchen Hacks to Prevent Milk from Spoiling : चहा, कॉफी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी घरात दूध लागतंच. पण दूध नीट साठवलं नाही तर ते लवकर खराब होतं, विशेषतः उन्हाळ्यात. दूध नेहमी ताजं राहावं यासाठी काही सोप्या किचन टिप्स पाहूया.

PREV
15
रूम टेंपरेचरला दूध ठेवू नका
कच्चं दूध जास्त वेळ रूम टेंपरेचरला ठेवू नये. यामुळे दुधात बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळे दूध एकतर उकळून ठेवा किंवा थेट फ्रिजमध्ये ठेवा.
25
उकळल्यानंतर दूध थंड होऊ द्या
दूध उकळल्यानंतर ते नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या. दूध अचानक थंड करण्याऐवजी हळूहळू थंड होऊ दिल्यास त्यात जंतू तयार होत नाहीत आणि ते खराब होत नाही.
35
काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात साठवा
दूध नेहमी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात साठवा. प्लॅस्टिकच्या भांड्यात दूध ठेवल्यास त्यात लवकर बॅक्टेरिया तयार होतात आणि दूध खराब होण्याची शक्यता वाढते.
45
दूध वारंवार गरम करू नका
आपण चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी दिवसभरात अनेकदा दूध गरम करतो. पण दूध सतत गरम केल्यामुळे त्यातील पोषक तत्वं नष्ट होतात आणि त्याची चवही बदलते.
55
तीव्र वासाच्या पदार्थांपासून दूर ठेवा
फ्रिजमध्ये दूध ठेवताना, लसूण, कांदा किंवा इतर तीव्र वास असलेल्या पदार्थांपासून ते दूर ठेवा. अशा पदार्थांच्या वासामुळे दूध लवकर खराब होऊ शकतं.
Read more Photos on

Recommended Stories