
उन्हाळ्याचे दिवस माणसांप्रमाणेच पक्षांसाठीही खूप कठीण असतात. कडक उन्हात अन्नाच्या शोधात फिरणं त्यांना अवघड जातं. पण, तुमच्या बाल्कनीत किंवा खिडकीत टांगलेला एक छोटासा बर्ड फीडर (Small Bird Feeder) या मुक्या जिवांची तहान आणि भूक भागवू शकतो. शिवाय, यामुळे तुमच्या घराला एक नवीन आणि क्रिएटिव्ह लुकही मिळेल. चला तर मग, पाहूया अशाच काही सोप्या आयडिया, ज्या कमी वेळेत तुमच्या घराला एक कलरफुल आणि आकर्षक लुक देतील.
या फोटोमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे टिन कॅन बर्ड फीडर दाखवले आहेत. हे तुम्ही किचनमधील मसाल्यांच्या डब्यांपासून सहज बनवू शकता. यासाठी, ६ छोटे डबे घ्या आणि त्यांना एका लाकडी पट्टीवर उभ्या पॅटर्नमध्ये लावा. डब्यांच्या आत एक छोटी लाकडी काडी ठेवा, जेणेकरून पक्ष्यांना त्यावर सहज बसता येईल. ही आयडिया घराला क्लासी आणि कूल लुक देण्यासाठी बेस्ट आहे. शिवाय, तुम्ही हे कोणत्याही ऋतूत वापरू शकता.
या स्टैगर्ड डिझाइनच्या बर्ड फीडरसाठी तीन वेगवेगळ्या आकाराचे डबे वापरले आहेत, जे एका पांढऱ्या रंगाच्या लाकडी ठोकळ्याला जोडलेले आहेत. यात डबे थोडे वर-खाली लावल्यामुळे डिझाइन साधं असूनही खूप आकर्षक दिसतं.
जुन्या नारळाची करवंटी चांगली स्वच्छ करा आणि तिला ड्रिलने भोक पाडून वरच्या बाजूला टांगण्याची सोय करा. या भोकांमधून सुतळी ओवून त्याला लटकवण्यासाठी हँगिंग स्ट्रक्चर तयार करा. त्यात पक्षांसाठी दाणे किंवा फळांचे तुकडे टाका. आता हे तुमच्या बाल्कनीत किंवा खिडकीबाहेर लटकवा.
बर्ड फीडरसाठी दुसरी कोणती आयडिया (Bird Feeder Ideas) सुचत नसेल, तर बिस्किटाचा एखादा जुना टिनचा डबा घ्या. डब्याला आणि झाकणाला ड्रिलने भोक पाडून ते स्क्रूने एकमेकांना जोडा. टांगण्यासाठी हुक किंवा लहान लाकडी तुकड्याचा वापर करा. तुम्ही हवं तर दोरीसुद्धा लावू शकता. आता खालच्या भागात दाणे भरून ठेवा. हा बर्ड फीडर बागेसाठी, बाल्कनीसाठी किंवा टेरेससाठी अगदी परफेक्ट आहे.