कार्ड टाकून सिक्रेट पिन नंबर टाकताच एटीएममधून पैसे बाहेर येतात. यावेळी या मशीनमध्ये किती पैसे असतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण तुम्हाला माहित आहे का, ते पूर्ण भरण्यासाठी किती पैसे लागतात? तेच आपण जाणून घेऊयात.
एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) ही बँकिंग क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. पूर्वी पासबुक घेऊन बँकेत तासनतास उभे राहिल्यावर पैसे मिळायचे, तेही कॅशिअरच्या मर्जीवर अवलंबून असायचं. त्याने कॅश नाही सांगितल्यास काहीच करता येत नसे. पण एटीएम आल्यामुळे बँकेत जाण्याची गरजच उरली नाही. कार्ड घेऊन एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढण्याची सोय झाली. एका एटीएममध्ये पैसे नसले तर दुसऱ्या एटीएममधून काढता येतात. यूपीआय आणि ऑनलाइन पेमेंट वाढल्यानंतर एटीएमचा वापर कमी झाला, पण पूर्वी पैसे हवे असल्यास हाच एकमेव आधार होता.
25
एटीएम मशीनमागे एक गुंतागुंतीचे तंत्रज्ञान -
आपण रोज वापरत असलेले एटीएम मशीन दिसायला खूप सामान्य वाटते. कार्ड टाकून, गुप्त पिन नंबर टाकताच काही सेकंदात पैसे हातात येतात. पण या सोप्या कामामागे एक खूप गुंतागुंतीचे तंत्रज्ञान काम करते.
35
एटीएममध्ये किती पैसे असतात -
अनेकदा “एटीएममध्ये पैसे नाहीत” असा बोर्ड पाहून आपण निराश होतो. तेव्हा “एका एटीएममध्ये जास्तीत जास्त किती पैसे असू शकतात?” असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर, एटीएम मशीनच्या आत एक खास कॅश कॅसेट असते.
जर सर्व चलनी नोटा ५०० रुपयांच्या असतील, तर एका एटीएममध्ये एकाच वेळी ४० लाख ते ५० लाख रुपये ठेवता येतात. पण प्रत्यक्षात असं क्वचितच घडतं. कारण एटीएममध्ये ५०० रुपयांच्या नोटांसोबत १०० आणि २०० रुपयांसारख्या कमी मूल्याच्या नोटाही ठेवल्या जातात.
55
एटीएममध्ये किती पैसे ठेवायचे हे कोण ठरवतं -
एवढेच नाही तर एका एटीएममध्ये किती पैसे भरायचे हे बँका ठरवतात. एटीएमचे ठिकाण, लोकांचा वापर आणि ते शहर किंवा गावात आहे यासारखे घटक यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सरासरी एका एटीएममध्ये २० लाख ते ३० लाख रुपये असतात.