DIY Planters: नारळाची करवंटी ते जुने बुट, टाकाऊ वस्तूंपासून अशा बनवा कुंड्या

Published : Mar 12, 2026, 09:16 PM IST

DIY Planters: आजकाल बाल्कनी, किचन गार्डन किंवा टेरेस सजवण्यासाठी DIY प्लांटर्सचा ट्रेंड खूप वाढला आहे. तुम्ही घरातल्या जुन्या आणि टाकाऊ वस्तू वापरून सुंदर कुंड्या बनवू शकता. चला, आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या आयडिया सांगणार आहोत...

PREV
16
कोकोनट शेल प्लांटर

नारळाची करवंटी बायोडिग्रेडेबल (सहज मातीत मिसळणारी) आहे आणि लहान रोपांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. करवंटी स्वच्छ करून तिला एक लहान छिद्र पाडा. त्यात माती भरून सक्यूलंट (succulent) किंवा एखादं छोटं रोप लावा. दोरीने बांधून तुम्ही ही कुंडी बाल्कनी किंवा गार्डनमध्ये लटकवू शकता.

26
ओल्ड शू प्लांटर

जुन्या बुटांपासून तुम्ही एकदम हटके आणि मॉडर्न डिझाइनची कुंडी बनवू शकता. यासाठी जुने बूट आधी स्वच्छ करून घ्या. पाणी बाहेर जाण्यासाठी खाली एक ड्रेनेज होल (छिद्र) पाडा. त्यात माती भरून तुम्ही फुलझाडं किंवा मनी प्लांटसारखी रोपं सहज लावू शकता.

36
प्लास्टिक बॉटल प्लांटर

हा सर्वात सोपा आणि सर्वाधिक वापरला जाणारा DIY प्लांटर आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या बाटल्या वापरू शकता. बाटली मधून कापा, बाहेरून रंग द्या किंवा डिझाइन काढा. त्यात माती भरून कोणतंही रोप लावा आणि भिंतीवर टांगा. यात रोपं सहज वाढतात.

46
जुन्या टायरपासून आकर्षक कुंडी

जुन्या टायरपासून तुम्ही एक आकर्षक कुंडी बनवू शकता. यासाठी जुना टायर स्वच्छ करून त्याला रंगीबेरंगी पेंट करा, हवं तर त्यावर काही डिझाइन काढा. त्याच्या खाली एक बेस तयार करा. माती भरा आणि मग त्यात शोभेची झाडं, फुलझाडं किंवा तुमच्या आवडीचं कोणतंही रोप लावून गार्डनमध्ये ठेवा.

56
जुन्या कपपासून प्लांटर

जुन्या कप किंवा मगपासूनही तुम्ही प्लांटर बनवू शकता. यासाठी जुना सिरॅमिक मग घ्या, पाणी बाहेर जाण्यासाठी खाली एक छोटं छिद्र पाडा. त्यात एखादं मिनी प्लांट किंवा सक्यूलंट लावा. तुम्ही हे टेबलवर, खिडकीजवळ किंवा गार्डनमध्येही ठेवू शकता.

66
DIY प्लांटर बनवायचे फायदे

DIY प्लांटरमुळे टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर होतो. कमी खर्चात घराला सुंदर सजावट मिळते. सोबतच, गार्डन आणि बाल्कनीला एकदम युनिक लूक येतो.

Read more Photos on

Recommended Stories