
DIY Backflow Incense Craft: आजकाल 'बॅकफ्लो धूपबत्ती होल्डर' खूप ट्रेंडमध्ये आहेत. देवघरापासून ते थेट डायनिंग रूमपर्यंत, घरभर सुगंध पसरवण्यासाठी धूपबत्ती लावण्याची ही पद्धत चांगलीच लोकप्रिय झाली आहे. यामुळे घरात फक्त सुगंधच नाही, तर एक सकारात्मकता (positivity) सुद्धा येते, ज्यामुळे घरातलं वातावरण शांत आणि प्रसन्न वाटतं. दिसायलाही हे होल्डर्स खूपच ट्रेंडी आणि आकर्षक असतात. बाजारात सध्या २००-३०० रुपयांपासून ते अगदी हजारो रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिझाइनचे बॅकफ्लो धूपबत्ती स्टँड मिळतात. पण तुम्ही घरच्या घरी, टाकाऊ वस्तूंपासून अगदी कमी खर्चात शानदार बॅकफ्लो धूपबत्ती स्टँड बनवू शकता. चला तर मग, प्लास्टिक बॉटल, थर्माकोल, कार्ड बोर्ड आणि क्ले वापरून हे कसं बनवायचं ते पाहूया.
हा 'DIY बॅकफ्लो धूपबत्ती' स्टँड बनवण्यासाठी, सर्वात आधी थर्माकोलला वरच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे आकारात कापून घ्या. आता क्ले (माती) वापरून हा संपूर्ण आकार व्यवस्थित कव्हर करा. क्लेनेच एक छोटी मटकी, दोन दिवे आणि एक जग तयार करा आणि फोटोत दाखवल्याप्रमाणे जागेवर लावा. क्ले सुकण्याआधीच जगाच्या वरच्या बाजूला एक छिद्र (होल) पाडा. तुमच्या कल्पकतेनुसार यावर डिझाइन तयार करा आणि त्याला शाइनी ब्राऊन आणि गोल्डन रंगाने कलर करा. आता जगाच्या वरच्या छिद्रावर धूपबत्ती ठेवा. तुमचा DIY बॅकफ्लो धूपबत्ती स्टँड तयार आहे!
सापाच्या आकाराचा 'DIY स्नेक धूप बॅकफ्लो' होल्डर बनवण्यासाठी, सर्वात आधी कोल्डड्रिंकची एक छोटी पारदर्शक प्लास्टिकची बॉटल घ्या. फोटोत दाखवल्याप्रमाणे, बॉटलच्या खालच्या बाजूने कापायला सुरुवात करून वर एक लांब पट्टीसारखा आकार कापा आणि खालचा भाग गोल ठेवा. आता वरच्या पट्टीला ॲल्युमिनियम फॉइलच्या मदतीने सापाच्या फण्यासारखा आकार द्या. खालच्या गोल भागाला क्लेने कव्हर करा आणि शेवटी सापाच्या वेटोळे घातलेल्या शेपटीसारखा आकार द्या. फण्याच्या भागालाही क्लेने भरा. आता एका काडीच्या मदतीने क्लेवर सापाच्या शरीराची डिझाइन आणि डोळे बनवा. फण्याच्या वरच्या बाजूला क्ले सुकण्याआधी एक छिद्र करा. क्ले पूर्णपणे सुकल्यावर त्याला ब्राऊन-क्रीम रंगाने कलर करा. आता फण्यावरील छिद्रावर धूपबत्ती ठेवून पेटवा. तुमचा DIY स्नेक धूप बॅकफ्लो होल्डर तयार आहे.