
Diwali 2025 Bank Holiday : काही दिवसांत सणासुदीचा काळ सुरू होणार आहे. आधी दिवाळी, त्यानंतर भाऊबीज, छठ पूजा आणि इतर अनेक सण साजरे केले जातील. यंदा दिवाळीच्या नेमक्या तारखेबद्दल लोकांमध्ये थोडा गोंधळ आहे. काही लोक 20 ऑक्टोबर, सोमवारी दिवाळी साजरी करत आहेत, तर काही 21 ऑक्टोबर, मंगळवारी साजरी करत आहेत. यासोबतच, यंदा दिवाळीला बँकांना सुट्टी कधी असेल, असा प्रश्नही लोकांच्या मनात आहे.
आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, 20 ऑक्टोबरला दिवाळीमुळे अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. तथापि, काही शहरांमध्ये या दिवशी बँका सामान्यपणे सुरू राहतील. यामध्ये इंफाळ, गंगटोक, पाटणा, बेलापूर, जम्मू, श्रीनगर, नागपूर, भुवनेश्वर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. येथे बँका सुरू राहतील. 21 ऑक्टोबरला दिवाळी आणि गोवर्धन पूजेमुळे अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, ओडिशा, मणिपूर, भुवनेश्वर, बेलापूर इत्यादींचा समावेश आहे.
या महिन्यात 'या' दिवशी बँका बंद राहतील
18 ऑक्टोबर – काती बिहूमुळे आसाममधील सर्व खाजगी आणि सरकारी बँका बंद राहतील.
20 ऑक्टोबर – या दिवशी देशभरात दिवाळीचा मुख्य सण साजरा केला जाईल. त्यामुळे जवळपास सर्व राज्यांतील बँका बंद राहतील.
21 ऑक्टोबर – गोवर्धन पूजेमुळे जवळपास सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
27 ऑक्टोबर – छठ पूजेमुळे पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील.
28 ऑक्टोबर – छठ पूजेमुळे बिहार आणि झारखंडमध्ये बँका बंद राहतील.