Daily Investment : रोज 100 रुपयांची बचत करुन करोडपती होण्याचा सिक्रेट प्लॅन

Published : Sep 16, 2026, 05:01 PM IST

रोज फक्त १०० रुपयांची बचत करून तुम्ही भविष्यात मोठा फंड उभा करू शकता, असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात. पण खरंच रोज १०० रुपये वाचवून करोडपती होता येतं का? तज्ज्ञांनी सांगितलेला हा सिक्रेट प्लॅन नक्की काय आहे, जाणून घ्या.

PREV
17
फक्त १०० रुपयांच्या बचतीतून मुलांचं शिक्षण आणि रिटायरमेंट प्लॅनिंग कसं करायचं?

मुंबई : करोडपती होण्यासाठी लाखो रुपयांचा पगार असावा लागतो किंवा मोठी गुंतवणूक करावी लागते, असा अनेकांचा समज असतो. पण फायनान्सच्या जगात छोट्या रकमा सुद्धा दीर्घकाळात चमत्कार घडवू शकतात. तुम्ही रोज फक्त १०० रुपये वाचवून योग्य ठिकाणी गुंतवले, तर कालांतराने एक मोठा फंड तयार करू शकता. यासाठी फक्त शिस्त, सातत्य आणि संयम हवा, असं आर्थिक तज्ज्ञ सांगतात.

27
रोज १०० रुपयांची गुंतवणूक हा योग्य निर्णय आहे का?

ज्यांच्याकडे मोठी रक्कम नाही आणि जे गुंतवणुकीला घाबरतात, त्यांच्यासाठी रोज १०० रुपये ही एक उत्तम सुरुवात आहे. रोज १०० रुपये म्हणजे महिन्याला सरासरी ३,००० रुपये होतात. विशेषतः विद्यार्थी, गृहिणी आणि छोट्या नोकऱ्या करणारे लोक कोणतीही अडचण न येता हा एसआयपी (SIP) प्रवास सुरू करू शकतात.

37
पैसे नेमके कुठे गुंतवायचे?

तुमचं ध्येय, कालावधी आणि जोखीम घेण्याची क्षमता यानुसार तुम्ही खालील पर्याय निवडू शकता:

१. इक्विटी म्युच्युअल फंड (SIP): दीर्घकाळात जास्त परतावा देणारा हा एक उत्तम मार्ग आहे. पॉवर ऑफ कंपाउंडिंगमुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात. बाजारात चढ-उतार असले तरी, दीर्घकाळात चांगला परतावा मिळतो.

२. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF): केंद्र सरकारचा पाठिंबा असलेली ही एक सुरक्षित योजना आहे. याचा कालावधी १५ वर्षांचा असतो. मार्केट रिस्क न घेता स्थिर परतावा हवा असलेल्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे.

३. रिकरिंग डिपॉझिट (RD): यात दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करण्याची सुविधा असते. बँकेच्या व्याजदरानुसार यावर परतावा मिळतो.

४. फिक्स्ड डिपॉझिट (FD): एकाच वेळी मोठी रक्कम जमा करण्यासाठी याचा उपयोग होतो.

47
१०० रुपयांच्या बचतीतून करोडो रुपये

तुम्ही रोज १०० रुपये म्हणजेच महिन्याला ३,००० रुपयांची बचत करून १२% वार्षिक चक्रवाढ (कंपाउंडिंग) परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केली, तर दीर्घकाळात एक मोठा फंड तयार होतो. पहिल्या १० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ३,६०,००० रुपये होईल, त्यावर अंदाजे ३,३७,००० रुपये परतावा मिळून तुमचा एकूण फंड ६,९७,००० रुपयांपर्यंत पोहोचेल. हीच गुंतवणूक तुम्ही २० वर्षे चालू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक ७,२०,००० रुपये होईल.

कंपाउंडिंगच्या ताकदीमुळे तुमचा अंदाजित परतावा २२,७८,००० रुपयांपर्यंत वाढेल आणि तुमच्या हातात एकूण २९,९८,००० रुपये येतील. जर तुम्ही ३० वर्षांच्या दीर्घ कालावधीचा विचार केला, तर तुमची एकूण गुंतवणूक फक्त १०,८०,००० रुपये असेल, पण त्यावर तुम्हाला तब्बल ९४,२९,००० रुपये परतावा मिळेल. यामुळे तुमचा एकूण फंड १.०५ कोटी रुपये होईल आणि तुम्ही करोडपती व्हाल.

57
रोजची बचत वाढवली तर काय फायदा होईल?

तुम्ही रोज १०० रुपयांऐवजी १५० किंवा २०० रुपयांची बचत केली, तर परिणामांमध्ये खूप मोठा फरक दिसेल.

• रोज १५० रुपयांची गुंतवणूक: महिन्याला ४,५०० रुपये होतात. १२% सरासरी परताव्यानुसार २० वर्षांत ४४.९७ लाख रुपये आणि ३० वर्षांत १.५८ कोटी रुपये जमा होतील.

• रोज २०० रुपयांची गुंतवणूक: महिन्याला ६,००० रुपये होतात. २० वर्षांत ५९.९६ लाख रुपये आणि ३० वर्षांत तब्बल २.१० कोटी रुपये तुम्हाला मिळू शकतात.

67
स्टेप अप एसआयपी आणि कंपाउंडिंगची ताकद

दरवर्षी तुमचं उत्पन्न जसजसं वाढेल, तसतशी तुमची गुंतवणूकही किमान १० टक्क्यांनी वाढवली पाहिजे. याला 'स्टेप अप एसआयपी' (Step Up SIP) म्हणतात. उदाहरणार्थ, या वर्षी तुम्ही महिन्याला ३,००० रुपये गुंतवत असाल, तर पुढच्या वर्षापासून ती रक्कम ३,३०० रुपये करा. मध्येच गुंतवणूक थांबवल्यास कंपाउंडिंगचा फायदा मिळत नाही. व्याजावर व्याज मिळणे, हाच कंपाउंडिंगचा मुख्य नियम आहे.

77
छोटे गुंतवणूकदार कोणत्या मोठ्या चुका करतात?

• मध्येच गुंतवणूक थांबवणे: अल्पकालीन गरजांसाठी एसआयपी (SIP) थांबवल्यामुळे कंपाउंडिंगचा फायदा हातातून जातो.

• मार्केटची जास्त भीती: मार्केट पडल्यावर घाबरून पैसे काढून घेणे ही एक मोठी चूक आहे.

• पोर्टफोलिओचा रिव्ह्यू न करणे: दरवर्षी किमान एकदा तरी तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Read more Photos on

Recommended Stories