Toy Upcycling लहान मुलांची जुनी खेळणी अनेकदा घरात कोपऱ्यात पडून असतात. काही तुटल्यावर तर आपण त्यांना सरळ उचलून कचऱ्यात टाकतो. पण थोडी क्रिएटिव्हिटी वापरली, तर याच जुन्या खेळण्यांपासून घरासाठी सुंदर डेकोरेशनच्या वस्तू बनवता येतात.
आजकाल DIY होम डेकोर आणि अपसायकलिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोक जुन्या वस्तूंना नवीन रूप देऊन घराला एक युनिक आणि आकर्षक लुक देत आहेत. तुमच्या घरातही जुने टेडी, कार, बाहुल्या किंवा बिल्डिंग ब्लॉक्स पडून असतील, तर तुम्ही त्यांना स्टायलिश होम डेकोर वस्तूंमध्ये बदलू शकता. चला, काही सोप्या आणि मस्त आयडिया पाहूया.
26
घरात पडून असलेली छोटी-छोटी खेळणी एकत्र करून एका फ्रेमवर चिकटवा. यातून तुम्ही एक सुंदर 3D वॉल आर्ट तयार करू शकता. हे तुम्ही मुलांच्या खोलीत किंवा लिव्हिंग एरियामध्ये लावून घराला एक आकर्षक लुक देऊ शकता.
36
जुन्या बाहुलीचा वरचा भाग काढून टाका आणि त्यात छोटी रोपं लावा. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेंड खूप गाजतोय. तुम्ही यात सक्युलेंट, मनी प्लांट किंवा मिनी कॅक्टससारखी रोपं लावू शकता. यामुळे एक खूपच युनिक लुक तयार होतो.
असं एकही घर नसेल जिथे टेडी बिअर नाही. तुमच्या घरातही मोठे-छोटे टेडी बिअर धूळ खात पडले असतील, तर त्यांना थोडं मॉडिफाय करा. जुन्या टेडी बिअरला कापून किंवा रि-स्टाईल करून तुम्ही कुशन कव्हरवर सजवू शकता. यामुळे मुलांच्या खोलीला खूपच गोंडस लुक येईल.
56
मुलांचे लेगो किंवा बिल्डिंग ब्लॉक्स घरात सगळीकडे पसरलेले असतात. त्यांचा पसारा बघून कधीकधी रागही येतो. पण तुम्ही याच ब्लॉक्सपासून एक मस्त फोटो फ्रेम बनवू शकता. लेगो किंवा बिल्डिंग ब्लॉक्स एकमेकांना जोडून एक युनिक फोटो फ्रेम तयार करता येते. यामुळे तुमच्या मुलांच्या आठवणी आणखी खास होतील.
66
जुन्या टॉय कारला रंगीबेरंगी पेंट करून एक नवीन लुक द्या. मग त्यावर एक छोटा कंटेनर लावून त्याचा पेन स्टँड बनवा. यामुळे मुलांच्या स्टडी टेबलला एक क्युट आणि क्रिएटिव्ह लुक मिळेल.