Male Infertility पुरुषांमध्ये आता इनफर्टिलिटी राहणार नाही समस्या, लॅबमध्ये बनवला स्पर्म

Published : Jun 02, 2025, 08:34 PM IST
Skin care for men

सार

अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदी बातमी समोर आली आहे. आता मानवी स्पर्मही लॅबमध्ये तयार करता येणार आहे.

बिजिंग : बाळाचे वडील होऊ न शकणे ही बाब पुरुषांसाठी अत्यंत मानहानी करणारी असते. त्यामुळे स्पर्म डोनर सारखी कल्पना अस्तित्वात आली. परंतु, दुसर्‍या पुरुषाचा स्पर्म स्वीकरणे हा एक अत्यंत धाडसी निर्णय आहे. त्यामुळे काही लोक त्यापासून दूर राहतात. अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदी बातमी समोर आली आहे. आता मानवी स्पर्मही लॅबमध्ये तयार करता येणार आहे. 

पुरुष वंध्यत्वामुळे बाळ होण्यात अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन चिनी शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्सच्या मदतीने स्पर्म तयार केले आहेत. शास्त्रज्ञांना लॅबमधील संशोधनादरम्यान आढळले की उंदरांची निरोगी बाळेही या प्रक्रियेद्वारे झाली आहेत. शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनामुळे वडील होऊ न शकणाऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.

स्टेम सेल्स ही अशी विशेष पेशी असतात जी सहजपणे दुसऱ्या पेशींचे रूप घेऊ शकतात. स्टेम सेल्सना लॅबमध्ये स्पर्म सेल्समध्ये बदलले जाते. नंतर स्पर्म सेल्सना उंदराच्या अंड्यामध्ये फलित केले जाते. अशाप्रकारे स्पर्म सेल्सच्या मदतीने निरोगी बाळे जन्माला आली.

मानवांसाठी ही नवी शोध का मदतगार आहे?

उंदरांवर केलेले यशस्वी प्रयोग मानवांमध्येही आशेचा किरण निर्माण करतात. जे जोडपे जैविक बाळाला गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही नवी शोध फायदेशीर ठरू शकते.

पुरुष वंध्यत्व का होते?

पुरुषांमध्ये बंध्यत्वाची कारणे कमी प्रमाणात स्पर्मचे उत्पादन असते. तसेच जुनी दुखापत, आरोग्याची समस्या किंवा इतर कारणांमुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. अनेकदा जीवनशैलीतील बदलांमुळेही पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. काही गोष्टींकडे लक्ष दिले तर वंध्यत्वाची समस्या दूर करता येते.

  • बंध्यत्व दूर करण्यासाठी धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन बंद करावे.
  • आहारात निरोगी अन्नपदार्थ समाविष्ट करावेत.
  • रोज व्यायाम केल्यानेही वंध्यत्वाची समस्या दूर करता येते.
  • डॉक्टर तपासणीनंतरच वंध्यत्वाचे कारण सांगू शकतात. तुम्ही डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी जेणेकरून कारण जाणून वंध्यत्वावर उपचार करता येतील.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

१०० रुपयात गर्लफ्रेंडला नवीन वर्षात द्या हे गिफ्ट, पर्याय जाणून घ्या
दोन मिनिटात रील करा एडिट, या ट्रीक्सचा करून पहा वापर