दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च रोजी संपतील. बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील.
दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२४-२५ शैक्षणिक वर्षातील १० वी आणि १२ वीच्या सार्वजनिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होतील.
CBSE दहावीची पहिली परीक्षा इंग्रजीची आहे. दहावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च रोजी संपतील. बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील.
१० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या आयोजनाबाबत CBSE ने तपशीलवार माहिती दिली आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी २०२५ रोजी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी रोजी सुरू होतील. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा बाह्य परीक्षकांच्या देखरेखीखाली घेतल्या जातील. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीत घेतल्या जातील.
cbse.gov.in या वेबसाइटवरून सविस्तर वेळापत्रक मिळेल. cbseacademic.nic.in या वेबसाइटवरून प्रश्नपत्रिकांचे नमुने मिळतील.