मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदासाठी भरती होणार?; पाहा अधिक माहिती

टाटा मेमोरियल सेंटर मुंबईअंतर्गत नोकरीची भरती करण्यात येणार आहे. कोणत्या पदावर भरती होणार? पाहा इच्छुक उमेदवारांनी याची माहिती

 

मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नोकरीची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया यांबद्दल नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी माहिती घ्यावी. तसेच, या पदासाठी निवड कशी करण्यात येईल पाहा.

पद आणि पदसंख्या

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत, अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. परंतु, या पदासाठी किती जागांवर भरती होईल याबद्दल कोणतीही आकडेवारी नोकरीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली नाही.

शैक्षणिक पात्रता

अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण असणे अपेक्षित आहे. तसेच, संबंधित क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा

अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ४० वर्षे, अशी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे.

वेतन

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अपघाती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास दरमहा ८४,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

टाटा मेमोरियल सेंटर अधिकृत वेबसाइट लिंक

https://tmc.gov.in/index.php/en/

अधिसूचना लिंक

https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=28972

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

अपघाती वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची निवड ही ‘वॉक इन इंटरव्ह्यू’द्वारे म्हणजेच मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

या वॉक इन इंटरव्ह्यू / मुलाखतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीच्या दिवशी हजर राहायचे आहे.

मुलाखतीचा हजर राहण्याचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई- ४०००१२.

मुलाखतीसाठी उमेदवारांनी सोबत ठेवावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे :

स्वतःचा अपडेटेड बायोडेटा

पासपोर्ट साईज फोटो

आधार कार्डाची प्रत

पॅन कार्डाची प्रत

सर्व शैक्षणिक आणि अनुभवाची प्रमाणपत्रे

उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे.

या पदासाठी २७ मे २०२४ रोजी वॉक इन इंटरव्ह्यू / मुलाखत घेण्यात येणार आहे.

मुलाखतीची वेळ ही सकाळी ९:३० ते १०:३० अशी ठेवण्यात आली आहे.

वरील पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, त्यांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना यांची लिंकवर नमूद केलेली आहे.

 

Share this article