Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीची संधी, कसा करायचा अर्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणत्या पदांवर भरती निघाली आहे. याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्यावी.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 30, 2024 6:32 AM IST

Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध ‘इंजिनियर’ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रात, पात्रता निकष आणि अर्ज कसा करावा याबद्दल माहिती जाणून घ्यावी. तसेच या नोकरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे हे देखील नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्यावे.

पद आणि पदसंख्या

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer Civil] या पदासाठी एकूण ६ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer Electrical] या पदासाठी एकूण २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ८ रिक्त पदांवर मुंबई विद्यापीठाअंतर्गत उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer Civil] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनियनरींगमधील किमान ३ वर्षांची पदवी अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच, संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

कनिष्ठ अभियंता [Jr. Engineer Electrical] या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल इंजिनियनरींगमधील किमान ३ वर्षांची पदवी अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित क्षेत्रातील किमान १ वर्ष कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

वेतन

कनिष्ठ अभियंता [Junior Engineer Civil] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,०००/- रुपये देण्यात येणार आहे.

कनिष्ठ अभियंता [Jr. Engineer Electrical] या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४०,०००/- रुपये देण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ अधिकृत वेबसाईट

https://mu.ac.in/

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑफलाईन / मुलाखतीद्वारे करायचा आहे.

या नोकरीसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवण्यात आले आहेत.

मुलाखतीसाठी जाताना उमेदवारांनी नोकरीचा अर्ज सोबत ठेवावा.

नोकरीच्या अर्जामध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती उमेदवारांनी भरावी.

तसेच, अर्जासह आपली आवश्यक कागदपत्रे बरोबर न्यावी.

नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांनी, दिलेल्या वेळेच्या किमान अर्धातास आधी उपस्थित राहावे.

वरील नोकरीच्या मुलाखती ८ जुलै २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत.

मुलाखतीची वेळ ही सकाळी १० वाजता [१०:०० am] ठेवण्यात आली आहे.

मुलाखत स्थळ : मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभागृह,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, तिसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व] मुंबई,९८

उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत हजर राहणे अनिवार्य आहे. उशिरा आलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही.

आणखी वाचा :

MahaGenco Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अनुभवी इंजिनियर्सना नोकरीची संधी, असा करा अर्ज

 

 

Share this article