CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत होणार मोठी भरती!, पाहा अर्जाची अंतिम तारीख

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रामध्ये कोणत्या पदासाठी भरती होणार आहे. याची नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी माहिती पाहावी.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 6, 2024 7:06 AM IST

CDAC Recruitment 2024 : प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत मॅनेजर आणि प्रोजेक्ट इंजिनीयर या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी एकूण किती जागा रिक्त आहेत. त्याची माहिती नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी जाणून घ्यावी. त्याचबरोबर नोकरीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता, पात्रता निकष आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे, याची माहिती पाहावी.

पद आणि पदसंख्या

प्रोग्राम मॅनेजर [Program Manager] या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट इंजिनीयर [Project Engineer] या पदासाठी एकूण ३६ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट मॅनेजर [Project Manager] या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीयर [Senior Project Engineer] या पदासाठी एकूण १९ रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ५९ रिक्त जागांवर प्रगत संगणक विकास केंद्रांतर्गत भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती ही प्रत्येक नोकरीच्या अधिसूचनेमध्ये वाचावी.

वेतन

प्रोग्राम मॅनेजर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक १७.५२ लाख रुपये इतके वेतन देण्यात येईल.

प्रोजेक्ट इंजिनीयर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक ७.८६ ते ८.९४ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.

प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक १७.५२ लाख रुपये इतके वेतन देण्यात येईल.

वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनीयर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास वार्षिक ९.६५ ते ११.५१ लाख रुपयांदरम्यान वेतन देण्यात येईल.

प्रगत संगणक विकास केंद्र अधिकृत वेबसाईट

https://www.cdac.in/

अधिसूचना

https://careers.cdac.in/advt-details/ND-2952024-KDD5W

अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज करण्यासाठी प्रगत संगणक विकास केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर नोकरीच्या अर्जासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध आहे.

उमेदवारांनी उपलब्ध लिंकचा वापर करून, योग्य त्या ठिकाणी आपली अचूक माहिती भरावी.

अर्जासह उमेदवारांनी आपल्या फोटोची स्कॅन कॉपीदेखील जोडायची आहे.

उमेदवारांनी नोकरीच्या सर्व पर्यायांपैकी केवळ एकाच पदासाठी अर्ज करावा.

नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी भरणे अनिवार्य आहे.

नोकरीचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही १९ जून २०२४ अशी आहे.

Share this article