Car Market: आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातून होणाऱ्या कार निर्यातीत मोठे बदल दिसले आहेत. विशेषतः लहान कार आणि कॉम्पॅक्ट SUV ला परदेशात मोठी मागणी वाढली आहे. हा बदल भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राला एक नवी दिशा दाखवत आहे.
निर्यातीच्या बाबतीत मारुती सुझुकी अजूनही आघाडीवर आहे. कंपनीच्या लहान आणि बजेट सेगमेंटमधील मजबूत कार लाइनअपमुळे जागतिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेंडवरून स्पष्ट होते की, विकसित देशही 'मेड इन इंडिया' कार स्वीकारत आहेत.
24
फ्रॉन्क्स आणि जिम्नी कार्स ठरल्या सुपरहिट
यावर्षीच्या निर्यातीत मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Fronx) टॉपवर आहे. या कारची तब्बल 90,186 युनिट्स परदेशात पाठवण्यात आली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% पेक्षा जास्त वाढ आहे. याचबरोबर मारुती सुझुकी जिम्नी (Maruti Suzuki Jimny) सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या कारच्या 72,209 युनिट्सची निर्यात नोंदवली गेली, ज्यात जवळपास 50% वाढ दिसली. एक छोटी पण दमदार ऑफ-रोड SUV म्हणून जिम्नीला चांगली पसंती मिळत आहे.
34
इतर कार्सचीही चांगली कामगिरी
SUV सोबतच इतर कार्ससुद्धा निर्यातीत चांगली कामगिरी करत आहेत. ह्युंदाई वेर्ना (Hyundai Verna) आणि निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) यांसारख्या मॉडेल्सनाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी मिळत आहे. तसेच, मारुती सुझुकी स्विफ्ट, बलेनो आणि डिझायर यांसारख्या लहान कार्सदेखील निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
या वर्षाची आकडेवारी पाहिल्यास, ऑटोमोबाइल क्षेत्र पूर्णपणे SUV आणि कॉम्पॅक्ट कार्सकडे वळल्याचं स्पष्ट दिसतंय. ग्राहक आता कमी खर्चात, सहज वापरता येणाऱ्या गाड्यांना जास्त पसंती देत आहेत. येत्या काळात भारत एक जागतिक निर्यात हब (Global Export Hub) म्हणून आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. कंपन्या विविध देशांच्या गरजा लक्षात घेऊन नवीन मॉडेल्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.