डिसेंबर महिन्यात नवीन कार खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते, कारण अनेक कंपन्या आकर्षक सवलती देतात. विशेषतः, BMW इंडिया आपल्या 3 Series, 5 Series, X3, X5, आणि X7 सारख्या लक्झरी मॉडेल्सवर ₹2 लाखांपर्यंतचे फायदे देत आहे.
जर तुम्ही डिसेंबर महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कार कंपन्या आणि डीलरशिपकडून आकर्षक सवलती, एक्सचेंज बोनस आणि फायनान्स ऑफर्स दिले जातात. शिवाय, जानेवारीपासून अनेक कंपन्या कारच्या किमती वाढवतात, त्यामुळे डिसेंबरमध्ये खरेदी करून तुम्ही मोठी बचत करू शकता.
26
लक्झरी कार खरेदीसाठी योग्य वेळ
सालाच्या अखेरीस लक्झरी कार घेण्याचा प्लान करत असाल, तर BMW, Audi, Mercedes-Benz यांसारख्या नामांकित प्रीमियम ब्रँड्सकडून सध्या दमदार ऑफर्स उपलब्ध आहेत. विशेषतः BMW इंडिया आपल्या कार्सवर ₹1.50 लाख ते ₹2 लाखांपर्यंतचे बेनिफिट्स देत आहे.
36
BMW कार्सवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती
BMW इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, डिसेंबर महिन्यात BMW ची लक्झरी कार खरेदी केल्यास मोठा फायदा मिळू शकतो.
BMW 3 Series आणि BMW 5 Series मॉडेल्सवर ₹1.50 लाखांपर्यंतचा बेनिफिट
BMW X3, BMW X5 आणि BMW X7 सारख्या लक्झरी SUV वर ₹2 लाखांपर्यंतची सवलत