Low Budget Sedans : 5.49 लाखापासून सुरू; 33.73 किमी मायलेज आणि 6 एअरबॅग्स असलेल्या सेडान कार्स

Published : Oct 12, 2026, 05:45 PM IST

Low Budget Sedans: कमी बजेटमध्ये फॅमिलीसाठी सेडान कार घेण्याचा विचार करताय? मग फक्त किंमतच नाही, तर मायलेज, सेफ्टी आणि फीचर्सही महत्त्वाचे ठरतात. चला तर मग, बाजारात उपलब्ध असलेल्या टॉप ३ बजेट सेडान कार्स.

PREV
15
६ लाखांच्या आत मिळणाऱ्या सेडान कार्स

फॅमिलीसाठी नवीन कार घेताना आपण सर्वात आधी तिची किंमत आणि मायलेज पाहतो. पण त्याचसोबत प्रवाशांची सुरक्षा, इंटिरिअर फीचर्स आणि बूट स्पेस या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. याच गरजा लक्षात ठेवून जर तुम्ही सेडान कार घेण्याचा विचार करत असाल, तर टाटा टिगोर, ह्युंदाई ऑरा आणि मारुती सुझुकी डिझायर या तीन मॉडेल्सची तुलना नक्की करा. यातील काही मॉडेल्समध्ये कंपनी फिटेड सीएनजीचा पर्याय मिळतो. त्यामुळे रोज ऑफिसला जाणाऱ्यांना आणि फॅमिलीसोबत फिरणाऱ्यांना इंधनाचा खर्च वाचवता येतो. अर्थात, कारची किंमत तिचे व्हेरिएंट, शहर आणि डीलरच्या ऑफर्सनुसार बदलू शकते. त्यामुळे बुकिंग करण्यापूर्वी सध्याची किंमत नक्की तपासा.

25
टाटा टिगोर (Tata Tigor)

सर्वात आधी आपण टाटा टिगोरबद्दल जाणून घेऊया. या कारची किंमत ५.४९ लाख ते ८.८४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर सीएनजी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत सुमारे ७.२२ लाख रुपये आहे. याच्या सीएनजी व्हेरिएंटमध्ये ड्युअल सिलिंडर तंत्रज्ञान वापरले आहे, ज्यामुळे डिक्कीमध्ये भरपूर जागा मिळते. ही कार सीएनजीवर २६.४९ किमी प्रति किलो इतके मायलेज देते. यात ७ इंचांची टचस्क्रीन, हरमनची ऑडिओ सिस्टीम आणि ८ स्पीकर्स मिळतात. सुरक्षेसाठी यात ड्युअल एअरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी सारखे फीचर्स दिले आहेत. या कारचे सेफ्टी रेटिंग तपासताना ते कोणत्या वर्षाचे आणि कोणत्या व्हेरिएंटचे आहे, हे नक्की तपासा.

35
ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)

फीचर्सला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी ह्युंदाई ऑरा हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत ६ लाख ते ८.५४ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर सीएनजी व्हेरिएंटची किंमत सुमारे ७.७६ लाख रुपयांपासून सुरू होते. यात १.२ लिटर कप्पा पेट्रोल इंजिन दिले आहे. सीएनजीवर ही कार २२ ते २५ किमी प्रति किलो मायलेज देते. आरामदायी प्रवासासाठी यात ८ इंचांची टचस्क्रीन, वायरलेस मोबाईल चार्जिंग आणि ऑटोमॅटिक एसी सारखे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या बाबतीत यात ६ एअरबॅग्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि रिअर व्ह्यू कॅमेरा दिला आहे. पण हे सर्व फीचर्स प्रत्येक व्हेरिएंटमध्ये मिळतीलच असे नाही, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी व्हेरिएंटनुसार फीचर्स नक्की तपासा.

45
मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)

या तिन्ही कार्समध्ये सर्वात जास्त सीएनजी मायलेज मारुती सुझुकी डिझायर देते. कंपनीच्या दाव्यानुसार, डिझायरचे सीएनजी व्हेरिएंट ३३.७३ किमी प्रति किलो मायलेज देते. तर पेट्रोल मॅन्युअलमध्ये २४.७९ किमी/लिटर आणि ऑटोमॅटिकमध्ये २५.७१ किमी/लिटर मायलेज मिळते. डिझायरची किंमत ६.२६ लाख ते ९.३२ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. सीएनजीचा पर्याय ठराविक व्हेरिएंट्समध्येच मिळतो. सुरक्षेसाठी कंपनीने यात ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, एबीएस आणि ईबीडी सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय टचस्क्रीन, वायरलेस मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि काही व्हेरिएंट्समध्ये ड्रायव्हर असिस्ट फीचर्सही मिळतात.

55
फॅमिलीसाठी कमी बजेटमधील कार

थोडक्यात सांगायचे तर, या तिन्ही कार्सपैकी एक निवडताना तुमचा रोजचा वापर लक्षात घ्या. कमी बजेटमध्ये कार हवी असल्यास तुम्ही टाटा टिगोरचा विचार करू शकता. इंटिरिअर फीचर्स आणि सुरक्षेला महत्त्व देणाऱ्यांसाठी ह्युंदाई ऑरा बेस्ट आहे. तर सीएनजी मायलेजला प्राधान्य देणाऱ्यांसाठी मारुती सुझुकी डिझायर हा एक उत्तम पर्याय ठरतो. पण लक्षात ठेवा, कंपनीने दिलेले मायलेज हे टेस्टिंगच्या वेळचे असते. ट्रॅफिक, ड्रायव्हिंग स्टाईल, प्रवाशांची संख्या आणि रस्त्यांची स्थिती यानुसार प्रत्यक्ष मायलेज बदलू शकते. तसेच कारच्या मूळ किंमतीसोबतच इन्शुरन्स, आरटीओ खर्च आणि मेंटेनन्सचाही विचार करा. जवळच्या डीलरकडे जाऊन सध्याची किंमत आणि ऑफर्स तपासा आणि टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतरच योग्य निर्णय घ्या.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories