२०२६ मध्ये नवीन 125cc बाईक घ्यायचा विचार करताय? जास्त मायलेज आणि कम्फर्ट देणाऱ्या होंडा, हिरो, टीव्हीएस आणि बजाजच्या टॉप ५ बाइक्सची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.
भारतात 125cc बाईक मार्केटमध्ये आता परफॉर्मेंस आणि मायलेज दोन्ही हवं असलेल्या ग्राहकांसाठी खूप चांगले ऑप्शन्स आहेत. नोव्हेंबर २०२६ च्या आकडेवारीनुसार, होंडा, हिरो, टीव्हीएस आणि बजाजच्या बाइक्स या सेगमेंटमध्ये टॉप ५ वर आहेत. या बाइक्स रोजच्या प्रवासासाठी इंधनाची बचत करण्यासोबतच, स्पोर्टी लूक आणि मॉडर्न फीचर्स देतात. जर तुमचं बजेट १ लाखाच्या आत असेल, तर या बाइक्स तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. यात इंजिन, मायलेज, फीचर्स आणि एक्स-शोरूम किमतींची सविस्तर माहिती दिलीय. जर तुम्ही पहिल्यांदाच बाईक घेत असाल आणि रोजच्या ऑफिस-कॉलेज प्रवासासाठी चांगली बाईक शोधत असाल, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.
27
होंडा SP 125 - रोजच्या प्रवासासाठी बेस्ट चॉईस
तुम्हाला इंधनाची बचत आणि रोजच्या प्रवासात आराम हवा असेल, तर होंडा SP 125 एक उत्तम पर्याय आहे. यात 123.94cc चं सिंगल-सिलिंडर फ्युएल-इंजेक्डेट इंजिन मिळतं. हे इंजिन 7,500 rpm वर 8 kW (10.87 bhp) पॉवर आणि 6,000 rpm वर 10.9 Nm टॉर्क जनरेट करतं. यात ५-स्पीड गिअरबॉक्स आहे. ११ लिटरची पेट्रोल टाकी असलेल्या या बाईकमध्ये कंपनी ६३ किमी प्रति लिटर मायलेजचा दावा करते. ट्रॅफिकमध्ये पेट्रोल वाचवण्यासाठी यातील आयडलिंग स्टॉप सिस्टीम खूप उपयोगी पडते. यात LED हेडलॅम्प, USB टाइप-C चार्जिंग आणि डिजिटल कन्सोल मिळतं. याची सुरुवातीची किंमत सुमारे ९०,४९८ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
37
हिरो Xtreme 125R - स्पोर्टी लूक आणि परफॉर्मेंस
हिरो Xtreme 125R ही या लिस्ट मधील सगळ्यात स्पोर्टी बाईक आहे. रुंद मागचा टायर आणि मोनोशॉक सस्पेन्शन मुळे ही साध्या कम्युटर बाइक्स पेक्षा वेगळी दिसते. यात 124.7cc चं एअर-कूल्ड इंजिन दिलंय जे 11.4 bhp पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क देतं. ५-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या बाईकमध्ये ६६ kmpl पर्यंत मायलेज मिळतं, असा कंपनीचा दावा आहे. यात ३ राइड मोड्स, क्रूझ कंट्रोल आणि ड्युअल-चॅनेल ABS सारखे सेफ्टी फीचर्स आहेत. याची एक्स-शोरूम किंमत ९१,५०० रुपयांपासून १.१६ लाख रुपयांपर्यंत आहे. तरुणांना स्पोर्टी आणि स्टायलिश बाईक हवी असेल तर हा चांगला ऑप्शन आहे.
टीव्हीएस Raider 125 मध्ये स्पोर्टी लूक, आरामदायी राइड आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजीचा छान मेळ साधलाय. या सेगमेंट मधील ही सर्वात जास्त टेक फीचर्स असलेली बाईक आहे. यात 124.8cc चं ३-व्हॉल्व्ह एअर-ऑइल कूल्ड इंजिन मिळतं. iGO टेक्नॉलॉजी असलेल्या वेरियंट मध्ये जास्त टॉर्क मिळतो. या बाईकचं मायलेज साधारण ५६.७ kmpl असल्याचं सांगितलं जातं. यात ५-इंचाचा TFT कन्सोल, स्मार्टएक्सकनेक्ट, व्हॉईस असिस्ट आणि २ राइडिंग मोड्स (Eco आणि Power) मिळतात. ट्रॅफिक मध्ये आरामात चालवण्यासाठी यात ‘ग्लाइड थ्रू टेक्नॉलॉजी’ दिलीय. याची किंमत सुमारे ८४,४६० रुपयांपासून सुरू होऊन टॉप मॉडेल १,०३,१७० रुपयांपर्यंत जातं (एक्स-शोरूम).
57
बजाज पल्सर 125 - क्लासिक स्पोर्टी फील
कमी CC मध्ये 'पल्सर' चा फील आणि लूक हवा असेल तर बजाज पल्सर 125 अजूनही लोकांची फेव्हरेट आहे. पल्सरच्या २५व्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट २०२६ मध्ये कंपनीने ही बाईक अपडेट केलीय. यात 124.4cc चं फ्युएल-इंजेक्डेट इंजिन आहे, जे 11.93 bhp पॉवर आणि 11.4 Nm टॉर्क देतं. या ५ बाइक्स मध्ये हे सर्वात पॉवरफुल इंजिन आहे. पेट्रोल वाचवण्यासाठी यात काही मॉडेल्समध्ये ऑटोमॅटिक स्टार्ट-स्टॉप फीचर सुद्धा दिलंय. नवीन मॉडेल्स मध्ये ५ इंची TFT कन्सोल, गुगल मॅप्स नेव्हिगेशन, ब्लूटूथ आणि ३ राइडिंग मोड्स मिळतात. अपडेटेड पल्सर 125 ची सुरुवातीची किंमत ९४,०९३ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
67
हिरो Glamour X 125 - आरामदायक प्रवासासाठी
हिरो Glamour X 125 ही बाईक स्टाईल पेक्षा कम्फर्ट आणि मायलेजवर फोकस करते. यात 124.7cc चं इंजिन दिलंय जे 11.4 bhp पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करतं. E20 पेट्रोलवर ही बाईक ६५ kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. रोजच्या प्रवासासाठी यात १० लिटरची मोठी टाकी आणि आरामदायक लांब सीट दिलंय. यात Eco, Road आणि Power असे ३ राइडिंग मोड्स, पनीक ब्रेक अलर्ट, अडॅप्टिव्ह डिजिटल डिस्प्ले आणि क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स आहेत. या बजेट मध्ये क्रूझ कंट्रोल मिळणं ही मोठी गोष्ट आहे. याची एक्स-शोरूम किंमत साधारण ८९,७६७ रुपयांपासून १.०१ लाख रुपयांपर्यंत आहे.
77
२०२६ मध्ये कोणती 125cc बाईक खरेदी करावी?
कोणती बाईक घ्यायची हे तुमच्या बजेट, रोजचा प्रवास आणि आवडीवर अवलंबून असतं. जास्त मायलेज हवं असेल तर होंडा SP 125 किंवा हिरो Glamour X 125 कडे पाहू शकता. जर स्पोर्टी लूक आवडत असेल तर हिरो Xtreme 125R आणि बजाज पल्सर 125 उत्तम ऑप्शन्स आहेत. नवीन टेक्नॉलॉजी आणि फीचर्स हवे असतील तर टीव्हीएस Raider 125 आणि पल्सरचे टॉप व्हेरियंट बेस्ट ठरतील. रोजच्या आरामदायी प्रवासासाठी SP 125 आणि Raider चं सिंगल सीट मॉडेल चांगलं आहे. फक्त एक्स-शोरूम किंमत बघू नका, रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स पकडून 'ऑन-रोड' किंमत नक्की चेक करा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .