३. रोगप्रतिकारशक्ती वाढते:
तुपामध्ये निरोगी चरबी असतात. तसेच तुपामधील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. म्हणून दररोज एक चमचा तूप रिकाम्या पोटी किंवा गरम पाण्यात मिसळून पिल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे अनेक प्रकारचे संसर्गजन्य रोग येण्यापासून बचाव होतो.
४. मेंदूचे आरोग्य सुधारते:
तुपामधील गुणधर्म मेंदूचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करतात. म्हणजेच तुपामधील जीवनसत्त्व ई मेंदूला रोगांपासून वाचवण्यास आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते. दररोज रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास तुमचा मेंदू नेहमीच निरोगी राहील.