Astrology: राहू देणार आत्मविश्वास, शुक्र देणार पैसा; पण कोणाला? जाणून घेऊयात...

Published : Mar 03, 2026, 12:11 PM IST

Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, 2 मार्च रोजी ग्रहांची एक मोठी युती होत आहे. यात मायावी ग्रह राहू आणि धन-वैभव देणारा ग्रह शुक्र एकत्र येत आहेत. या युतीमुळे काही राशींचं नशीब चांगलंच चमकणार आहे.

PREV
14
वृषभ राशी
शुक्र आणि राहूची युती तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून किंवा ऑनलाइन व्यवसायातून फायदा होऊ शकतो.
24
मिथुन राशी
ही युती तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल आहे. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. मार्केटिंग, मीडिया, आयटी क्षेत्रातील लोकांना परदेशात विशेष लाभ मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रवासाचे योग आहेत.
34
धनु राशी
तुमचं धैर्य आणि सामर्थ्य वाढेल. मालमत्ता, वाहन किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची चिन्हं आहेत. कुटुंबाच्या मदतीने घेतलेला आर्थिक निर्णय यशस्वी ठरेल. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होईल. पण गुंतवणूक हुशारीने करा.
44
मीन
तुमचा आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल. करिअरमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. उत्पन्न वाढेल. कला, डिझाइन, चित्रपट, फॅशन आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होईल.
Read more Photos on

Recommended Stories