Apple लवकरच आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन (iPhone Fold) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फोनच्या लाँचिंगपूर्वीच त्याची किंमत, बॅटरी, डिझाइन आणि डिस्प्लेबद्दलची माहिती लीक झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया.
क्यूपर्टिनोची टेक कंपनी Apple आपल्या आयफोनमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. अँड्रॉइड कंपन्यांनी पटापट फोल्डेबल फोन आणले, पण Apple ने नेहमीप्रमाणे पूर्ण अभ्यास करूनच 2026 मध्ये आपला पहिला फोल्डेबल आयफोन आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा डिझाइन बदल ठरू शकतो.
25
अल्ट्रा-थिन ग्लास आणि पॉलिमर लेअर्स
या फोनला सध्या 'आयफोन फोल्ड' असं म्हटलं जातंय. हा फोन एखाद्या पुस्तकाप्रमाणे उघडेल. बंद असताना याचा बाहेरचा स्क्रीन 5.3 ते 5.5 इंच असेल, तर उघडल्यावर आतला डिस्प्ले 7.7 ते 7.8 इंच असेल, ज्यामुळे तुम्हाला एका छोट्या टॅबलेटचा अनुभव मिळेल. Apple या फोनच्या मजबुतीसाठी अल्ट्रा-थिन ग्लास आणि पॉलिमर लेअर्स वापरणार आहे.
35
टायटॅनियम फ्रेम
फोल्डेबल फोनच्या स्क्रीनवर जी घडीची रेष (crease) दिसते, ती कमी करण्यासाठी Apple खास प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनी एक विशेष मेटल प्लेट आणि लिक्विड मेटल हिंज वापरणार आहे. तसेच, फोनला मजबूत बनवण्यासाठी टायटॅनियम फ्रेम दिली जाण्याची शक्यता आहे.
लीक झालेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 48-मेगापिक्सल सेन्सरसह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल. आतल्या आणि बाहेरच्या बाजूला वेगवेगळे फ्रंट कॅमेरे असू शकतात. फेस आयडीऐवजी साईड बटणामध्ये टच आयडी परत येऊ शकतो. याशिवाय, कंपनी स्वतःचा मॉडेम चिप वापरू शकते आणि फोन फक्त ई-सिम सपोर्ट करेल.
55
लाँचिंग सप्टेंबर 2026 मध्ये अपेक्षित
या फोनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी देण्याचा Apple चा प्रयत्न आहे. रिपोर्ट्सनुसार, आयफोन फोल्डची किंमत 1,800 ते 2,500 यूएस डॉलर्स (सुमारे 1.5 लाख ते 2.10 लाख रुपये) असू शकते. हा Apple चा सर्वात महागडा आयफोन ठरू शकतो. या फोनचं लाँचिंग सप्टेंबर 2026 मध्ये अपेक्षित आहे.