iPhone Price Hike : ऍपलचा मोठा झटका! iPhone 17 तब्बल 17,000 रुपयांनी महागला, जाणून घ्या नवी किंमत

Published : Sep 10, 2026, 12:32 PM IST
iPhone Price Hike : ऍपलचा मोठा झटका! iPhone 17 तब्बल 17,000 रुपयांनी महागला, जाणून घ्या नवी किंमत

सार

नवीन iPhone 18 Pro आणि फोल्डेबल iPhone Duo लाँच झाल्यानंतर, ऍपलने भारतात iPhone 17 च्या किमतीत अचानक १७,००० रुपयांची वाढ केली आहे. AI इंडस्ट्रीमुळे मेमरीची मागणी वाढल्याने ही मोठी दरवाढ झाली असून, याचा परिणाम iPhone 17e आणि 16 सारख्या इतर मॉडेल्सवरही झाला आहे.

मुंबई : काल रात्री Apple आपला नवीन आयफोन 18 Pro सीरिज आणि पहिला फोल्डेबल हँडसेट iPhone Duo सादर केला. साधारणपणे नवीन मॉडेल आलं की ऍपल आपल्या जुन्या आयफोनच्या किमती कमी करतं. पण यावेळी मात्र तसं झालं नाही. उलट ऍपलने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. कंपनीने iPhone 17 च्या किमती कमी करण्याऐवजी त्या वाढवल्या आहेत.

ऍपलने भारतात iPhone 17 च्या किमतीत तब्बल १७,००० रुपयांची वाढ केली आहे. iPhone 17 चं 256GB मॉडेल जे आधी ८२,९०० रुपयांना मिळत होतं, ते आता ९९,९०० रुपयांना विकलं जात आहे. तर 512GB मॉडेलची किंमत आता १,२४,९०० रुपये झाली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, iPhone 17 चं बेसिक मॉडेल आता १ लाखाच्या आकड्यापासून फक्त १०० रुपये दूर आहे. ही नवीन किंमत लगेचच लागू झाली आहे, त्यामुळे गेल्या वर्षी लाँच झालेल्या किमतीपेक्षा हा फोन आता खूपच महाग झाला आहे.

ऍपलने किंमत का वाढवली?

ऍपलसाठी किमती बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही ऍपलने मॅकबुक, आयपॅड आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढवल्या होत्या. iPhone 17 ची किंमत वाढणार याचा अंदाज आधीपासूनच होता. यामागे एक मोठं कारण म्हणजे रॅम आणि मेमरीचा तुटवडा. सध्या AI चा जमाना आहे आणि AI कंपन्यांना त्यांच्या सिस्टीमसाठी प्रचंड प्रमाणात मेमरीची गरज भासते. यामुळे मेमरीची मागणी वाढली आणि किमती गगनाला भिडल्या. याचा दबाव मेमरी बनवणाऱ्या कंपन्यांवर आला आणि त्यांनी दर वाढवले. याचा परिणाम फक्त ऍपलवरच नाही, तर अँड्रॉइड फोनच्या मार्केटवरही दिसतोय आणि आता त्याचा फटका आयफोनलाही बसला आहे.

ऍपलच्या इतर उत्पादनांच्या किमतीही वाढल्या

कंपनीने फक्त iPhone 17 च नाही, तर iPhone 17e, iPhone 16 आणि iPhone Air यांसारख्या इतर काही जुन्या मॉडेल्सच्या किमतीही वाढवल्या आहेत. iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच झाल्यानंतर, कंपनीने आपल्या परंपरेनुसार iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max बंद केले आहेत. पण हे मॉडेल्स स्टॉक संपेपर्यंत थर्ड-पार्टी सेलर्सकडे उपलब्ध असतील.

दरम्यान, iPhone 17e च्या किमतीत १५,००० रुपयांची वाढ झाली असून, तो आता ६४,९०० रुपयांऐवजी ७९,९०० रुपयांना मिळेल. iPhone 16 ची नवीन किंमत ८९,९०० रुपये झाली आहे. तर सर्वात मोठी वाढ iPhone Air च्या किमतीत झाली आहे. त्याची किंमत तब्बल ३०,००० रुपयांनी वाढून १,१९,९०० रुपयांवरून थेट १,४९,९०० रुपयांवर पोहोचली आहे.

iPhone 17 मध्ये काय खास आहे?

iPhone 17 मध्ये ६.३-इंचाचा १२० Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. यावर अँटी-रिफ्लेक्टिव्ह लेयर आणि Ceramic Shield 2 ग्लासचं प्रोटेक्शन आहे. याची कमाल ब्राईटनेस ३,००० निट्स आहे. फोनमध्ये ऍपलचा A19 प्रोसेसर आहे, जो भविष्यातील AI फीचर्ससाठी तयार केला गेला आहे. फोटोग्राफीसाठी यात ४८-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा (जो 2x ऑप्टिकल-क्वालिटी टेलीफोटो क्रॉप देतो) आणि ४८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी सेंटर स्टेजसह १८-मेगापिक्सलचा स्क्वेअर सेन्सर मिळतो. कंपनीचा दावा आहे की यात ३० तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक मिळेल, जो iPhone 16 पेक्षा ८ तासांनी जास्त आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Best Scooters : भारतीयांनी सर्वाधिक खरेदी केलेल्या टॉप 5 स्कूटर्स, पाहा संपूर्ण लिस्ट
iPhone Duo: किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, 'हा फोन घ्यायला दोन नोकऱ्या कराव्या लागतील!'