Tech News: आपण नवीन वर्षात पदार्पण केले आहे. यावर्षी अनेक क्षेत्रांमध्ये विकासाची गती वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या वर्षात अनेक अत्याधुनिक गॅझेट्स बाजारात दाखल होणार आहेत. चमत्कार घडवू शकणारी कोणती गॅझेटस आहेत ते जाणून घेऊया..
2026 मध्ये तंत्रज्ञान जग पूर्णपणे बदलेल. फोल्डेबल आयफोनसह, गुगल, सॅमसंग आणि मोटोरोला देखील नवीन डिव्हाइस आणत आहेत. फोल्डेबल फोन आणि XR ग्लासेस वापरकर्त्यांचा अनुभव बदलतील.
25
ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनकडून मोठ्या अपेक्षा
ॲपल 2026 च्या उत्तरार्धात पहिला फोल्डेबल आयफोन आणू शकते. यात 7.8-इंचाचा मुख्य आणि 5.5-इंचाचा कव्हर डिस्प्ले असेल. क्रीज-लेस डिस्प्ले हे याचे वैशिष्ट्य असेल. किंमत 2 लाखांवर असू शकते.
35
गुगल XR ग्लासेसमुळे मिळणार नवा डिजिटल अनुभव
गुगल 2026 मध्ये अँड्रॉइड XR ग्लासेस आणणार आहे. यात इन-लेन्स मायक्रो LED डिस्प्ले असेल. संगीत, व्हिडिओ कॉल्स, नॅव्हिगेशन यांसारखी वैशिष्ट्ये असतील. हे ग्लासेस जेमिनी एआय सपोर्टसह येतील.
सॅमसंगचा पहिला ट्राय-फोल्ड फोन लवकरच जागतिक बाजारात येईल. यात 10-इंचाचा डिस्प्ले असून एकाच वेळी तीन ॲप्स वापरता येतात. 5,600mAh बॅटरीमुळे मल्टीटास्किंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
55
Motorola च्या पहिल्या बुक-स्टाइल फोल्डेबलची तयारी
फ्लिप फोननंतर मोटोरोला आता बुक-स्टाइल फोल्डेबल फोन आणण्याच्या तयारीत आहे. हा फोन लवकरच सादर केला जाऊ शकतो आणि तो सॅमसंगच्या Z Fold सीरिजला टक्कर देईल, असा अंदाज आहे.