नोकरी न करता घरबसल्या पैसे कमवावेत, असं अनेकांना वाटतं. कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करून तो हळूहळू वाढवण्याकडे बहुतेकांचा कल असतो. तुम्हालाही घरच्या घरी स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हे छोटे बिझनेस आयडिया नक्की ट्राय करून पाहा.
घरगुती खाद्यपदार्थ - तुम्हाला चांगला स्वयंपाक येत असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. लोणची, मसाले, मिठाई, स्नॅक्स आणि टिफिन सेवा तुम्ही घरूनच सुरू करू शकता. सुरुवातीला नातेवाईक आणि मित्रांना विकून तुम्ही तुमचा कस्टमर बेस वाढवू शकता. फक्त चव, स्वच्छता आणि पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित करा.
बेकिंग बिझनेस - केक, कुकीज, ब्राउनी आणि कपकेकसारख्या बेकरी पदार्थांच्या ऑर्डर्स तुम्ही घेऊ शकता. वाढदिवस, लग्न आणि छोट्या कार्यक्रमांसाठी कस्टमाइज्ड ऑर्डर्सवर भर द्या. सोशल मीडियावर तुमच्या पदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ टाकून तुम्ही ग्राहकांना आकर्षित करू शकता.
25
हँडमेड वस्तू आणि टेलरिंग
हँडमेड प्रॉडक्ट्स - मेणबत्त्या, गिफ्ट हॅम्पर्स, डेकोरेशनच्या वस्तू आणि हाताने बनवलेली ज्वेलरी तयार करून तुम्ही विकू शकता. सण, वाढदिवस आणि खास प्रसंगी अशा कस्टमाइज्ड गिफ्ट्सना खूप मागणी असते. छोट्या स्तरावर सुरुवात करून ऑर्डर्सनुसार तुम्ही उत्पादन वाढवू शकता.
टेलरिंग किंवा कस्टम डिझायनिंग - तुम्हाला शिलाईकाम येत असेल, तर घरबसल्या कमाई करण्याची ही एक उत्तम संधी आहे. ब्लाउज, ड्रेसेस, लहान मुलांचे कपडे आणि अल्टरेशनच्या कामांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. ग्राहकांना आवडतील अशा डिझाइन्स देऊन आणि वेळेवर ऑर्डर्स पूर्ण करून तुम्ही कायमस्वरूपी ग्राहक मिळवू शकता.
35
ऑनलाइन रिसेलिंग आणि ट्युशन्स
ऑनलाइन रिसेलिंग - स्वतः कोणतेही उत्पादन न बनवता तुम्ही वस्तू रिसेल करून बिझनेस सुरू करू शकता. कपडे, होम डेकोर आणि किचन प्रॉडक्ट्स निवडून ते सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना दाखवा. पण, कोणत्याही प्लॅटफॉर्मचा वापर करण्यापूर्वी त्यांचे नियम, मार्जिन आणि रिटर्न पॉलिसी नक्की समजून घ्या.
ट्युशन्स किंवा ऑनलाइन क्लासेस - एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही घरबसल्या मुलांना ट्युशन्स देऊ शकता. शालेय विषयांशिवाय ड्रॉइंग, संगीत, भाषा आणि कॉम्प्युटर स्किल्स तुम्ही ऑनलाइन शिकवू शकता. सुरुवातीला छोट्या बॅचेस घेऊन नंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढवा.
सोशल मीडिया कंटेंट - लिखाण, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग आणि फोटो एडिटिंगसारखी कौशल्ये तुमच्याकडे असतील, तर तुम्ही फ्रीलान्स सेवा देऊ शकता. छोटे व्यवसाय, स्थानिक संस्था आणि कंटेंट क्रिएटर्सना सोशल मीडिया पोस्ट्स, व्हिडिओ आणि डिझाइन्सची नेहमी गरज असते. तुमच्या कौशल्याच्या जोरावर तुम्ही चांगले क्लायंट्स मिळवू शकता.
55
बिझनेस सुरू करण्यापूर्वीची तयारी
सुरुवात कशी करावी? - कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी मार्केटमध्ये त्या वस्तूला किंवा सेवेला खरंच मागणी आहे का, हे तपासा. स्पर्धा किती आहे, उत्पादन खर्च, पॅकेजिंग, डिलिव्हरी आणि मार्केटिंगचा खर्च किती येईल, याचा हिशोब करा. सुरुवातीला मोठी गुंतवणूक न करता छोट्या स्तरावर सुरुवात करा आणि ग्राहकांच्या प्रतिसादानुसार व्यवसाय वाढवा.
खाद्यपदार्थ किंवा कॉस्मेटिक्सचा व्यवसाय असेल, तर सरकारी परवाने आणि नियम आधीच जाणून घ्या. स्थानिक मार्केट, खर्च, मागणी आणि तुमच्या कौशल्यांचा अभ्यास करूनच गुंतवणूक करा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .