
घरात झाडे लावल्याने मानसिक आनंद आणि शांतता मिळण्यास मदत होते. पण झाडांची काळजी घेणे हे खूप वेळखाऊ काम आहे. विशेषतः झाडांना रोज पाणी घालावे लागते. काहीवेळा वेळेअभावी पाणी घालणे शक्य होत नाही. त्यामुळे, तुम्ही कमी पाण्यात वाढणारी ही इनडोअर रोपे घरात लावू शकता.
कोरफड हे अनेक आरोग्यदायी गुणांनी परिपूर्ण असलेले रोप आहे. हे केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. याच्या पानांमध्ये पाणी साठवलेले असल्यामुळे कोरफडीला रोज पाणी घालण्याची गरज नसते. या रोपाला थेट सूर्यप्रकाशाची गरज नसते.
स्नेक प्लांटला खूप कमी देखभालीची गरज असते. हे रोप कोणत्याही परिस्थितीत चांगले वाढते. स्नेक प्लांट अनेक आठवडे पाण्याशिवाय वाढू शकते, कारण ते आपल्या पानांमध्ये पाणी साठवून ठेवते. त्यामुळे माती कोरडी झाली तरी हे रोप अनेक दिवस टिकते.
जेड प्लांट
जेड प्लांटची पानेदेखील पाणी साठवून ठेवतात. हे एक असे रोप आहे जे उन्हाळ्यातही चांगले वाढते. जेव्हा माती पूर्णपणे कोरडी होईल, तेव्हाच या रोपाला पाणी घालावे.
झिझी प्लांट
झिझी प्लांट (ZZ Plant) हे कमी पाण्यात वाढणारे रोप आहे. हे रोप अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकते. त्यामुळे हे घरात सहजपणे वाढवता येते. याची चमकदार पाने घराला सुंदर लुक देतात.
बोगनवेल
बोगनवेल हे रोप घरामध्येही वाढवता येते. या रोपाला सुंदर फुले येतात. हे रोप पाण्याशिवाय अनेक दिवस वाढू शकते. मात्र, या रोपाला थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.