अन्नपदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवणे चांगले असते. पण सर्वच प्रकारचे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवता येत नाहीत. काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवताना विशेष काळजी घ्यावी लागते. ती नेमकी कोणती, ते जाणून घेऊयात.
कच्चे बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. यामुळे बटाट्याची चव आणि पोत दोन्ही खराब होते. बटाटे नेहमी रूम टेम्परेचरला, थंड आणि कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी ठेवावेत.
25
ब्रेड -
ब्रेड फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फ्रिजमधील थंड आणि दमट वातावरणामुळे ब्रेड लवकर खराब होतो. जास्त दिवस टिकवण्यासाठी तो फ्रीझरमध्ये ठेवणे चांगले.
35
टोमॅटो -
बरेच लोक टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवतात. पण जास्त थंडीमुळे टोमॅटोची चव आणि पोत बदलतो. तसेच, ते लवकर पिकून खराब होऊ शकतात.
45
आलं -
आलं फ्रिजमध्ये ठेवता येतं, पण योग्य पद्धतीने न ठेवल्यास ते लवकर खराब होतं. साल न काढता हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवणं चांगलं.
55
भात -
आपल्यापैकी बरेच जण उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवतात. पण तो योग्य पद्धतीने न ठेवल्यास लवकर खराब होतो. भात दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नये. हवाबंद डब्यात बंद करून ठेवावा.