
भावाचं लग्न म्हणजे बहिणीसाठी एक खास प्रसंग असतो. अशावेळी तुमचा लुकही हटके आणि खास हवा. तुम्ही साडी नेसणार असाल किंवा लेहंगा, नेहमीच्या साध्या ब्लाउजऐवजी हे काही मॉडर्न डिझाइन्स निवडा. हे ब्लाउज तुम्ही शिंप्याकडून शिवून घेऊ शकता किंवा बजेटमध्ये रेडीमेडही खरेदी करू शकता. चला, पाहूया असेच काही हटके आणि क्लासी लुक देणारे ब्लाउज डिझाइन्स.
पेपलम स्टाइल ब्लाउज दिसायला खूपच फॅन्सी दिसतात आणि साध्या साडीवरही छान मॅच होतात. कमरेपासून खाली फ्लेअर (घेर) असल्यामुळे हा ब्लाउउज खूपच आकर्षक दिसतो. तुम्ही साध्या साडीवर थोडंसं पारदर्शक कापड वापरून हा ब्लाउज शिवू शकता, ज्यामुळे पार्टी लुक मिळेल. समोरच्या बाजूला हँगिंग किंवा ज्वेलरीचं डिटेलिंग असेल, तर साध्या लुकलाही मॉडर्न टच मिळतो. तुम्ही तुमच्या टेलरला फोटो दाखवून असा ब्लाउज शिवून घेऊ शकता आणि भावाच्या लग्नात एक एलिगंट लुक मिळवू शकता.
आजकाल हलक्या आणि भारी, दोन्ही प्रकारच्या साड्यांवर डीप स्वीटहार्ट नेकलाइन असलेले ब्लाउज खूप पसंत केले जात आहेत. अशा ब्लाउजमध्ये पॅडेड लुक निवडा. हे केवळ आरामदायकच नसतात, तर फिगरला एक बॅलन्स लुक देतात. ब्लाउजवर जरी वर्क असो किंवा तो प्रिंटेड असो, ही मॉडर्न नेकलाइन सगळ्यांवरच उठून दिसते.
कटआउट नेकलाइन असलेले ब्लाउज साडी आणि लेहंगा या दोन्हींवर छान दिसतात. अशा ब्लाउजमध्ये तुम्ही समोरच्या बाजूला 'यू' नेकलाइन (U-neckline) बनवू शकता. तर, मागच्या बाजूला तुमच्या आवडीनुसार कट डिझाइन करू शकता. बाह्या तुम्ही फुल स्लीव्हज किंवा तुमच्या आवडीप्रमाणे स्लीव्हलेसही ठेवू शकता. ब्रोकेडच्या कापडात हा लुक जास्त चांगला दिसतो. हलक्या वर्कच्या कापडात असा मॉडर्न ब्लाउज शिवून तुम्ही कोणतीही हेवी ज्वेलरी न घालताही खास लुक मिळवू शकता.
बॅकलेस ब्लाउजचा ट्रेंड मुलींमध्ये नेहमीच पॉप्युलर असतो. तुम्ही बाजारातून तुमच्या आवडीची दोरी, लटकन किंवा टॅसल निवडू शकता आणि मग पाठीमागे मण्यांच्या मदतीने एक सुंदर लुक तयार करू शकता. लेहंगा किंवा साडीसोबत असा बॅकलेस मॉडर्न ब्लाउज तुमचा लुक पूर्णपणे बदलून टाकेल.