Umbrella Reuse: जुन्या छत्रीला फेकू नका! घर सजवण्यासाठी करा 'या' ५ भन्नाट कल्पक गोष्टी, दिसेल एकदम स्टायलिश

Published : Jun 16, 2026, 03:16 PM IST
Umbrella Reuse

सार

Umbrella Reuse तुमची जुनी, रंगीबेरंगी छत्री भंगारात विकण्याचा विचार करत असाल तर थांबा. कारण त्याच जुन्या छत्रीचा वापर करून तुम्ही घरासाठी सुंदर डेकोरेशन, शॉपिंग बॅग आणि बाल्कनीसाठी प्लांटर सुद्धा बनवू शकता. कसं ते जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

Umbrella Reuse पावसाळा संपल्यावर जुन्या झालेल्या छत्रीचं काय करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा आपण ती सरळ भंगारवाल्याला देतो. पण तुमची रंगीबेरंगी छत्री जुनी झाली असेल, तर तिला भंगारात विकण्याची काहीच गरज नाही. जुन्या छत्रीचा वापर तुम्ही घर सजवण्यासाठी अनेक प्रकारे करू शकता. समजा छत्रीचं कापड चांगलं आहे, पण तिची काडी किंवा दांडा तुटलाय, तरीही ती फेकून देऊ नका. भिंतीपासून ते बाल्कनीपर्यंत, सगळीकडे तुम्ही या जुन्या छत्रीचा वापर करू शकता. चला तर मग, जाणून घेऊया जुन्या छत्रीला पुन्हा कसं वापरायचं.

छत्रीने करा वॉल डेकोरेशन

जुन्या छत्रीचा वापर करून तुम्ही भिंतीला एक नवा आणि आकर्षक लुक देऊ शकता. यासाठी तुम्ही छत्रीच्या अर्ध्या कापडाचा वापर करून सुंदर वॉल डेकोरेशन तयार करू शकता. सोबत लहान छत्र्या लावल्यास ते अधिक सुंदर दिसेल.

छत्रीच्या कापडापासून बनवा फ्लोरल बॅग

जर तुमच्या छत्रीचं कापड अजूनही चांगल्या स्थितीत असेल, तर त्यापासून एक सुंदर आणि स्टायलिश बॅग बनवता येते. छत्रीच्या रंगीबेरंगी प्रिंटेड कापडापासून शॉपिंग बॅग किंवा कॅरी बॅग तयार करा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी छत्रीच्या कापडाची बॅग वापरून तुम्ही पर्यावरणाची मदतही करू शकता.

 

छत्रीपासून तयार करा प्लांटर

तुमच्याकडे जुनी मोठी छत्री असेल, तर ती उघडून त्यात माती भरा आणि सक्युलंट (succulent) सारखी झाडं लावा. लहान छत्री असेल तर त्यात छोटी रोपं लावून तुम्ही एक सुंदर हँगिंग प्लांटर तयार करू शकता. यात रंगीबेरंगी फुलं किंवा शोभेची रोपं लावून तुम्ही तुमची बाग किंवा बाल्कनी सजवू शकता. मातीत खत मिसळून ते मिश्रण छत्रीत भरा आणि त्यात बिया लावा. काही दिवसांतच त्यातून रोपं उगवलेली दिसतील.

फेरी लाईट्स आणि छत्रीने सजवा बाल्कनी

एखादी रंगीबेरंगी छत्री उलटी टांगा आणि तिच्या आतमध्ये फेरी लाईट्स (fairy lights) लावा. हे डेकोरेशन तुम्ही बाल्कनी किंवा टेरेसवर करू शकता. दिसायला हे खूपच फॅन्सी आणि आकर्षक दिसतं. त्यामुळे आता जुनी छत्री भंगारात विकण्याची चूक अजिबात करू नका.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Meenakari Peacock Kada: लग्नसराई आणि सणासुदीला हवाय रॉयल एथनिक लुक? ट्राय करा सध्या ट्रेंडमध्ये असलेले 'हे' मीनाकारी मोर कडे!
Bucket Cleaning: पिवळ्या पडलेल्या प्लास्टिकच्या बादलीला बनवा नव्यासारखं चकचकीत, ५ सोपे उपाय जाणून घ्या