Isuzu V-Cross 2026 जपानची कार कंपनी इसुझूने (Isuzu) आपली 2026 V-Cross पिकअप गाडी लाँच केली आहे. याची सुरुवातीची किंमत 25.50 लाख रुपये आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आता सर्व व्हेरिएंटमध्ये 4x4 सिस्टीम स्टँडर्ड मिळणार आहे.
Isuzu V-Cross 2026 जपानची कार कंपनी इसुझूने नुकतीच आपली पिकअप गाडी V-Cross चं 2026 मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 25.50 लाखांपासून सुरू होते.
28
थेट टक्कर टोयोटा हिलक्सशी
कंपनीने यावेळी काही मोठे बदल केले आहेत. V-Cross चं 4x2 मॉडेल बंद करण्यात आलं आहे. आता 2026 इसुझू V-Cross फक्त 4x4 सिस्टीमसोबतच मिळणार. भारतीय बाजारात याची थेट टक्कर टोयोटा हिलक्सशी (Toyota Hilux) होईल.
38
नवीन फ्रंट बंपर डिझाइन
2026 इसुझू V-Cross मध्ये नवीन फ्रंट बंपर डिझाइन आहे. यात क्लॅडिंग कमी केलं असून, बंपरवर ब्लॅक लिप दिला आहे. एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि फॉग लॅम्प जुन्या मॉडेलसारखेच आहेत, पण स्किड प्लेट काढण्यात आली आहे.
नवीन V-Cross मध्ये 18-इंचाचे नवे अलॉय व्हील्स दिले आहेत. गाडीची बॉडी डिझाइन आता अधिक आकर्षक आणि सिंपल दिसते. आधीचे ब्लॅक व्हील आर्च आणि साइड क्लॅडिंग काढून टाकण्यात आले आहेत.
58
आता 10.3-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन
गाडीच्या आतमध्ये सर्वात महत्त्वाचे बदल दिसतात. आधीच्या 9-इंच स्क्रीनऐवजी आता 10.3-इंचाची फ्लोटिंग टचस्क्रीन दिली आहे. ॲपल आणि अँड्रॉइड युजर्ससाठी वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीही आहे. इंटीरियरला सिंपल लूक दिला आहे.
68
8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम
या गाडीत 360-डिग्री कॅमेरा, 8-स्पीकर ऑडिओ सिस्टीम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) सारखे फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, स्टॅबिलिटी आणि ट्रॅक्शन कंट्रोल, हिल डिसेंट असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
78
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
इसुझू V-Cross मध्ये तेच जुनं 1.9-लीटर, 4-सिलेंडर टर्बो-डिझेल इंजिन वापरलं आहे. हे इंजिन 161 bhp पॉवर आणि 360 Nm टॉर्क जनरेट करतं. यात 6-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि शिफ्ट-ऑन-द-फ्लाय 4WD सिस्टीमचा पर्याय मिळतो.
88
तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
2026 इसुझू V-Cross तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे: 4WD MT Z, 4WD MT Z प्रेस्टीज आणि 4WD AT Z प्रेस्टीज. ही पिकअप गाडी सात रंगांमध्ये येते: सिल्की व्हाइट पर्ल, ब्लॅक मायका, रेड स्पिनेल मायका, नॉटिलस ब्लू, स्प्लॅश व्हाइट, गॅलेना ग्रे आणि सिल्व्हर मेटॅलिक.